दुर्मिळ ग्रिफॉन गिधाडाची पहिल्यांदाच नोंद : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जंगली जयगड भागात दिसला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दुर्मिळ ग्रिफॉन गिधाडची पहिल्यांदाच नोंद झाली आहे. अलीकडेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगली जयगड भागात गस्त घालत असताना वनक्षेत्रपाल सनहेल मगर व वनरक्षक संतोष चाळके यांना हा पक्षी जंगली जयगड परिसरात उडताना घिरट्या मारताना दिसला. त्यांनी त्याला केमेरा बद्द केले. त्यांनी अधिक अभ्यासासाठी हा फोटो पक्षी तज्ञ व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना दिलेले आहे.

सदर गीधाडावर अभ्यासाठी उजव्या पंखावर नारंगी टॅग लावलेला फोटोमध्ये दिसत आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पचे क्षेत्रसंचालक समाधान चव्हाण, उपसंचालक उत्तम सावंत , सहायक वनसंरक्षक सुरेश साळुंखे, वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांनी वनक्षेत्रपाल सनहेल मगर व संतोष चाळके यांचे ह्या दुर्मिळ नोंदणीसाठी कौतुक व अभिनंदन केले आहे.

दुर्मिळ ग्रिफॉन गिधाड हा पक्षी तिबेट, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान ते हिमालय नेपाळ, भूतान ते पश्चिम चीन आणि मंगोलिया दक्षिणेकडील युरोप, उत्तर आफ्रिका या भागात आढळतो.

हजारो किलोमीटरचा हा प्रवास करीत असतो. आकाशात उंच अशा घिरट्या घालत आपले अन्न शोधत असतो. ह्या पक्ष्याचे इंग्रजी नाव ग्रिफॉन वलचर शास्त्रीय नाव गीप्स फुल्वस असे आहे, हा एक अत्यंत मोठा पक्षी असून त्याची उंच साधारणपणे 125 से. मी. असते. तर दोन पंखांची लांबी साधारण 8 ते 9 फुटापर्यंत भरते. नर व मादी ग्रिफॉन गिधाडाचे वजन 8 ते 10 kg किलो पर्यंत नोंदवले गेले आहे, ही एक दुर्मिळ गिधाड प्रजाती आहे. ज्याचे डोक्यावर पंख पांढरे शुभ्र असतात तर पाठीवरचे पंक फार रुंद व तांबूस असतात व शेपटीचे पंख हे डार्क चॉकलेटी असतात. इतर गिधाडांप्रमाणेच, हा स्केवेंजर (कुजलेले व सडलेले मांस खाणारा) आहे. उंच कड्यांवर घरटे बनवतात तिबेट, कझाकिस्ता, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान ते हिमालय नेपाळ, भूतान ते पश्चिम चीन आणि मंगोलिया दक्षिणेकडील युरोप, उत्तर आफ्रिका येथील पर्वतांमध्ये ते प्रजनन करतात आणि एक अंडे देतात.

आंतरराष्ट्रीय संस्थाना सदरील नोंदीची माहिती दिली : रोहन भाटे

सदर गिधाड हे शास्त्रीय व स्थलांतराचे अभ्यासाठी कोणत्यातरी अभ्यासकाने हे टॅग लाऊन सोडलेले आहे, त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी वेगवेगळ्या देशात गिधाडांवर अभ्यास करणाऱ्या संशोधकांना व गिधाडं वर अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थाना संपर्क करून त्यांना ह्या नोंदीची माहिती दिली असल्याचे पक्षी तज्ञ व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी सांगतिले.

Leave a Comment