व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

घाटी रुग्णालयात स्थूल गर्भवतीची दुर्लभ शत्रक्रिया यशस्वी; बाळ आणि बाळंतीण सुखरूप

औरंगाबाद – गर्भवती महिलेचे वजन 155 किलो तर बी.एम.आय.66 प्रति मीटर स्केवर सर्वसाधारण माणसापेक्षा तिप्पट वाढलेल्या एका महिलेची अवघड व दुर्मिळ शस्त्रक्रिया औरंगाबादेतील शासकीय वैधकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे यशस्वी झाली. ही जगातील सातवी तर देशातील पहिली यशस्वी शत्रक्रिया असल्याचा दावा स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख डॉ.श्रीनिवास गडप्पा यांनी केला आहे.

शहरातील मिसरवाडी भागात राहणारी महिला गुडडी शेख (वय-28) या गर्भवती असल्याने त्यांनी एक महिन्याअगोदर घाटी रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधला त्यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांचा बीएमआय हा सर्वसाधारण माणसापेक्षा तिप्पट आल्याचे समोर आले. प्रसूतीची वेळ काही आठवड्यावर अली असताना. शेख यांच्या उपचाराला साजेशे आवश्यक साधन सामग्री रुग्णालयात उपलब्ध न्हवती. डॉक्टरांच्या विशेष प्रयत्नानी या महिलेसाठी विशेष व्हीलचेअर, मोठा स्ट्रेचर, शत्रक्रियेसाठी लागणारे गाऊन, भूल देण्यासाठी आवश्यक विशेष उपकरणे या सर्वांची विशेष उपलब्धता करण्यात आली.66 बी.एम.आय. असलेल्या आता पर्यंत जगात फक्त 6 च शस्त्रक्रिया पार पडलेल्या आहे.आणि यापूर्वी पर्यंत देशात अशी अवघड एकही शस्त्रक्रिया झालेली नसल्याने घाटी रुग्णालयातील डॉक्टरासमोर एक मोठे आव्हान होते. मात्र डॉक्टरांनी पूर्ण तयारीनिशी हे आव्हान यशस्वीपणे पूर्ण केले. अखेर 24 जानेवारी रोजी महिलेची सिझेरियन शत्रक्रिया करण्यात आली. महिलेने एका गोंडस मुलाला जन्म दिला. आता बाळंतीण आणि बाळ दोघेही सुखरूप आहे. या दुर्मिळ आणि अवघड शस्त्रक्रियेमुळे औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयाचे नाव जागतिक पातळीवर नोंदवले गेले आहे.

देशात पहिली शस्त्रक्रिया केल्याचा अभिमान

66 बीएमआय असलेल्या स्थूल महिलेची सिझेरियन प्रसूती ही घटना जगासाठी दुर्मिळ आहे.नोंदीनुसार जगात फक्त सहाच अश्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत.तर भारतात या शस्त्रक्रियेची पहिलीच घटना आहे. शासकीय घाटी रुग्णालय अवघड शस्त्रक्रिया करणारा देशातील पहिला आणि जगातील सातवा रुग्णालय आसल्याने आम्हाला अभिमान आहे. -डॉ.श्रीनिवास गडप्पा, विभाग प्रमुख

महिनाभर पथकाने घेतली काळजी
एक महीने आधीपासुनच भूल व शस्त्रक्रिया करिता लागणारी सर्व तयारी जसे सामग्रीची उपलब्धी, फुफुसाचे व्यायाम, वजन नियंत्रणात करण्याकरिता दररोज चालायचा व्यायाम, जंतुदोष याचे नियंत्रण, दिवसातून तीन वेळा रक्तदाब मोजणे, बाळाचे ठोके योग्य असल्याचे सोनोग्राफी वर किंवा एनएसटी मशीन वर खात्री करणे, रक्तातील साखरेचे प्रमाण मोजणे इत्यादी कामे नियमितपणे पथक दररोज करत होते. तर रुग्णाला आवश्यक असलेले सर्व संबंधित तज्ञ डॉक्टरांची मदत वेळोवेळी घेण्यात येत होती. ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा, पथक प्रमुख डॉ.विजय कल्याणकार, डॉ.सोनाली देशपांडे, डॉ.प्रशांत भिंगारे, डॉ.रुपाली एस. गायकवाड, डॉ. अमित काकडे, डॉ. प्रतिक्षा कांदळकर, डॉ. चैताली पांडव, डॉ. ऐश्वर्या एम., डॉ. हर्षिता एस.,डॉ.दिती आनंद, डॉ. अपूर्वा खटोकर, डॉ. धनश्री पाटील, डॉ. ऐश्वर्या चंदवाडे, सिस्टर तृप्ती पाडळे, रिबेका खंडागळे, चंद्रकला चव्हाण, दीपक शिराळे. आदींनी परिश्रम केले.

काय आहे बी.एम.आय ?
बीएमआय म्हणजे बॉडी मास्क इंडेस्क याचा वापर शरीरातील स्तुलतेचे प्रमाण मोजण्यासाठी होतो.सर्वसाधारण माणसाचा बीएमआय हा 20 ते 25 असतो, हाच आकडा जर 30 च्या वर गेला तर डॉक्टरांच्या भाषेत त्याला स्थूल समजले जाते. मात्र शेख यांचे बीएमआय हे तब्बल तिप्पट होते.