हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यावर्षी महाशिवरात्री 8 मार्च रोजी आली आहे. यंदाची महाशिवरात्री (Maha Shivratri) भक्तांसाठी अत्यंत विशेष ठरणार आहे. कारण, या महाशिवरात्रीला चार अतिशय शुभ योग येणार आहेत. हे शुभ योग तब्बल 250 वर्षांनंतर जुळून येतील. बरोबर या शुभयोगांवरच भगवान महादेव देखील आपल्या भक्तांवर कृपा दाखवतील. त्यामुळे भगवान शंकर यांना प्रसन्न करायचे असल्यास हे योग्य तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरतील. हे चार योग नेमके कोणते असतील यात भगवान शंकराची पूजा कशा पद्धतीने करायची हे जाणून घ्या.
2024 वर्षातील पहिल्या महाशिवरात्रीला 3 शुभयोग आणि 1 शुभनक्षत्र एकाच दिवशी एकत्र येणार आहेत. अशी घटना तब्बल 250 वर्षानंतर प्रथमच घडत आहे. त्यामुळे यादिवशी उपवास करणे, भगवान शंकराची आराधना करणे अत्यंत लाभदायी ठरेल. या शिवरात्रीला सर्वार्थ सिद्धी योग, शिवयोग, अमृतसिद्ध योग आणि श्रवण नक्षत्र असे चार योग असणार आहेत. हे योग तब्बल 250 वर्षानंतर जुळून येणार आहेत. त्यामुळे या योगांच्या कालावधीत भगवान शंकराची पूजा केल्यास घरात सुख नांदेल.
फाल्गुन चतुर्दशी केव्हा असेल?
8 मार्च रोजी 9.57 मिनिटांनी फाल्गुन चतुर्दशीला सुरूवात होईल. ही चतुर्दशी 5 वाजून 26 मिनिटांनी संपेल. मात्र यात महाशिवरात्रीचा उपवास आठ मार्च रोजी असेल. या दिवशी तब्बल चार तास भगवान शंकराची पूजा करण्यात येते. यंदाच्या महाशिवरात्रीला, सर्वार्थ सिद्धी योग, शिवयोग, अमृत सिद्धी योग असे तीन योग जुळून येतील. तसेच शिवरात्रीच्या दिवशी श्रवण नक्षत्र देखील असेल. त्यामुळे या शिवरात्रीला महादेवाची पूजा करणे भक्तांनी चुकवू नये.