“मी हिंदू संस्कृतीचा धर्मयोद्धा; मोहन भागवतांकडून हिंदू धर्माच्या रक्षणाची शपथ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच मोठे विधान केले आहे. हिंदू धर्मातून गेलेल्या लोकांना परत हिंदू धर्मात आणले जाईल. असे म्हणत त्यांनी मी हिंदू संस्कृतीचा धर्मयोद्धा आहे, अशी शपथ हिंदू एकता महाकुंभात सहभागी झालेल्या लोकांना शपथ दिली आहे.

मध्य प्रदेशातील चित्रकूटमध्ये या महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कुंभमेळाव्यास सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थिती लावली आहे. यावेळी ते म्हणाले की, लोकांनी हिंदू धर्माशिवाय इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर करू नये तसेच त्यांनी प्रत्येक स्त्रीचा आदर करावा. आजच्या घडीला सर्वात महत्वाचं म्हणजे हिंदूंमध्ये एकतेची गरज आहे.

बहुसंख्य समाजातील लोकांनी आजच्या काळात जातीयवाद आणि इतर सामाजिक वाईट गोष्टींपासून दूर रहावे. मी हिंदू संस्कृतीचा धर्मयोद्धा, प्रभू श्री रामांच्या संकल्पस्थळी, सर्व शक्तिमान देवाला साक्षी ठेवून, मी माझ्या पवित्र हिंदू धर्माचे, संस्कृती आणि हिंदू समाजाचे आयुष्यभर संरक्षण, संवर्धन आणि संरक्षण करण्याची शपथ घेतो. मी प्रतिज्ञा करतो की मी कोणत्याही हिंदू बांधवाला हिंदु धर्मापासून विचलित होऊ देणार नाही., अशी शपथ यावेळी भागवत यांनी दिली आहे.

Leave a Comment