हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बालाजीच्या प्रसादामध्ये भेसळ आढळल्यानंतर संपूर्ण देशभर हा मुद्दा खूपच उचलून घेतला गेलेला आहे. अशातच आता मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे सिद्धिविनायक प्रसादावर आता प्रश्नचिन्ह उभे करण्यात आलेला आहे. सिद्धिविनायक मंदिराचा प्रसाद जिथे ठेवला होता. त्या ठिकाणी उंदराची पिल्ले आढळलेली आहेत. त्यामुळे येथील प्रसाद आणि आसपासच्या परिसरात स्वच्छ ठेवले जात नाही. असा आरोप करण्यात आलेला आहे. आणि या संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे.
सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट तर्फे सगळ्या भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात येते. या ठिकाणी महाप्रसाद म्हणून लाडू ठेवला जातो. त्या ट्रेमध्ये उंदराची पिल्ले आता आढळलेली आहेत. त्यामुळे आता या लाडूच्या शुद्धतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहे. या व्हायरल होणारे व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एका ट्रेमध्ये प्रसादाचे लाडू ठेवण्यात आलेले आहे. आणि त्यात मेलेला उंदीर असल्याचे आढळून आलेले आहे.
सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या सचिव विना पाटील यांनी हे आरोप सगळे फेटाळून लावलेले आहे. त्यांनी वायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओ तपासलेले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, “आमच्याकडचा परिसर खूप स्वच्छ असतं. असे इथे कधीच घडणार नाही. उकरड्यावर काहीतरी फेकले असेल आणि त्याचा हा फोटो आणि व्हिडिओ घेतलेला आहे .असे आम्हाला वाटते परंतु ज्यावेळी ही माहिती मिळाली. त्यावेळी आम्ही सगळे कॅमेरे बसले. तेव्हा आम्हाला काही आढळले नाही. त्यामुळे हा व्हिडिओ फेक आहे. कोणाची तरी बदनामी करण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेला आहे. ज्यांनी हे केले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी असे त्यांनी सांगितलेले आहे.”
सिद्धिविनायक या मंदिरात दररोज 50 हजार लाडू बनवले जातात. आणि एका पाकिटमध्ये 50 ग्रॅमचे दोन लाडू असतात. सणासुदीच्या काळात या लाडवांना बाहेर खूप जास्त मागणी असते. भाविक भक्तांची देखील खूप गर्दी होते. त्यामुळे या लाडूंची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. प्रयोगशाळेचे चाचणीमध्ये असेच आढळून आले आहे की, हा लाडू सात ते आठ दिवस साठवून ठेवता येतो. तो अजिबात खराब होत नाही. परंतु या लाडवांच्या ट्रेमध्ये उंदीर असल्याचे सुटेस समोर आल्यानंतर मंदिराच्या स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह उभारण्यात आलेले आहे.