Ratan Tata : रतन टाटांच्या ‘त्या’ आदेशामुळे ताजबाहेर भटक्या श्वानाला मिळाला निवांतपणा; व्हायरल फोटोने वेधलं लक्ष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ratan Tata) रतन टाटा कायम आपल्या कृतीतुन समाजाला काही ना काही शिकवण आणि प्रेरणा देत असतात. आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो याची जाणीव ठेऊन ते कायम जबाबदारीने एक एक पाऊल उचलताना दिसतात. सोशल मीडियावर त्यांच्या अनेक कृतींबाबत कायम चर्चा होत असतात. दरम्यान, त्यांच्या अशाच एका कृतीने पुन्हा एकदा सगळ्यांचं मन जिंकलं आहे. आपण सारेच जाणतो की, मुंबईत रतन टाटा यांचे आलिशान ताज हॉटेल आहे. त्याची भव्यता आणि सुंदरता अनेकांसाठी आकर्षण आहे. या हॉटेल्सशी संबंधित एका दृश्याबाबत सोशल मीडियावर विशेष चर्चा सुरु आहे.

मुंबईतील हॉटेल ताज हे सर्वात आलिशान असे फाइव्ह स्टार हॉटेल आहे. अशा या हॉटेलमध्ये अनेक दिग्गज मंडळी तसेच व्यावसायिक आणि बडे लोक येत जात असतात. अशा हॉटेलच्या दरवाजासमोर एक श्वान निवांत झोपलेला दिसत असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो ताजमध्ये वास्तव्यास असलेल्या एका महिलेने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोसोबत या महिलेने शेअर केलेल्या पोस्टनंतर युजर्स रतन टाटा (Ratan Tata) यांच्या कृतीचे कौतुक करताना दिसत आहेत.

व्हायरल फोटो

मुंबईतील सगळ्यात आलिशान अशा ताज हॉटेलच्या आवारात एक भटका श्वान (भटका कुत्रा) झोपलेला पाहून हॉटेलमध्ये वास्तव्यास असणाऱ्या एका महिलेला थोडे आश्चर्य वाटले. इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये जिथे अनेक बडे सेलिब्रिटी, राजकीय नेते येत जात असतात. अशा ठिकाणी एका भटक्या श्वानाचे वावरणे ही बाब खरंतर खटकण्यासारखी होती. मात्र, रतन टाटा (Ratan Tata) यांनी स्वतः हॉटेलच्या आवारात येणाऱ्या प्राण्यांशी चांगले वागण्याच्या कडक सूचना दिल्याचे कर्मचाऱ्यांकडून समजताच ती महिला अवाक् झाली. यानंतर महिलेने एक पोस्ट शेअर करत रतन टाटा यांच्या निर्णयाचे कौतुक केले’.

महिलेची पोस्ट

(Ratan Tata)रतन टाटा यांच्या ताज हॉटेलमध्ये वास्तव्यास आलेल्या महिलेचे नाव रुबी खान असे आहे. तिने सोशल मीडियावर एक फोटो आणि त्यासोबत भली मोठी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने लिहिलंय, ‘इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये भटक्या श्वानाला पाहून आश्चर्य वाटले. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडून त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती घेतली. त्या माहितीनुसार, हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी तिला सांगितले की, तो जन्मापासून या हॉटेलचा एक भाग आहे. रतन टाटांनी स्वतः कडक सूचना दिल्या आहेत की, त्यांच्या हॉटेलच्या आवारात कोणी प्राणी आल्यास त्याला चांगली वागणूक द्यावी. या खास ठिकाणी श्वानाला सुरक्षित राहून शांततेने जगता येईल अशी जागा मिळाली आहे, हे पाहून मला आनंद झाला’.

पुढे लिहिलेय, ‘ताजमहाल हॉटेलमध्ये प्रतिष्ठित राजकीय व्यक्तींपासून ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींपर्यंत अनेक लोक येतात. त्यामुळे हॉटेल परिसर अगदी स्वच्छ, सुंदर आणि प्रतिमा जपणारा ठेवला जातो. अशा प्रतिष्ठित हॉटलेच्या प्रवेशद्वारालाही महत्त्व असते. पण, याच प्रवेशद्वारावर एक श्वान शांतपणे झोपला होता, बहुधा कोणाचेही त्याच्याकडे लक्ष गेले नसेल. या हॉटेलमध्ये मी समावेशन, मानसिक सुरक्षितता आणि भावनिक बुद्धिमत्ता अनुभवली’. (Ratan Tata) यावेळी रुबी खान यांनी रतन टाटांबाबत बोलताना म्हटले, ‘तुम्ही सर्वात यशस्वी उद्योजक होऊ शकता, परंतु तुम्ही सर्वांचा आदर करणे आणि आलिंगन देणे कधीही थांबवू नये’. ही पोस्ट व्हायरल झाली असून यावर अनेकांनी कमेंट करत रतन टाटा यांच्या महानतेविषयी आदर प्रकट केला आहे.