रतन टाटांच्या फोटोवर एका महिला वापरकर्त्याने लिहिले असे काही की लोकांनी केले तिला ट्रोल आणि त्यानंतर …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे इन्स्टाग्रामवर 1 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. चार महिन्यांपूर्वी इन्स्टाग्राम अकाउंट तयार करणार्‍या रतन टाटा यांनी त्वरित १०लाख फॉलोअर्स असताना एक पोस्ट शेअर केले होते. या पोस्टवर भाष्य करताना एका वापरकर्त्याने त्यांना “छोटू” म्हटले.रतन टाटा यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इन्स्टाग्राम अकाउंट तयार केले होते. यानंतर, मंगळवारी त्यांनी 10 लाख फॉलोअर्स झाल्यानंतर स्वत: चा एक फोटो शेअर केला.हे पोस्ट करताना त्यांनी लिहिले की, “जेव्हा मी इन्स्टाग्राममध्ये सामील झालो होतो तेव्हा मला या ऑनलाइन कुटुंबाची अपेक्षा नव्हती … म्हणून मी आपणा सर्वांचे आभार मानू इच्छितो”. रतन टाटा यांच्या या पोस्टला 4..8 लाखाहून अधिक लोकांनी पसंती दिली आहे.

 

रतन टाटांच्या या पोस्टवर बर्‍याच लोकांनी कमेंट केले पण त्यादरम्यान एका महिला वापरकर्त्याने त्यांना “छोटू” असे लिहिले. वापरकर्त्याने लिहिले, “अभिनंदन छोटू”, जे रतन टाटांच्या इतर फॉलोअर्सना आवडले नव्हते आणि त्यांनी वापरकर्त्याला ‘असभ्य’ म्हणून संबोधण्यास सुरवात केली. यानंतर, आपल्या बचावासाठी, महिला वापरकर्त्याने लिहिले, “ते प्रत्येकाचा आदर्श आहे आणि म्हणूनच मी त्यांना प्रेमाने काहीही सांगू शकते “. यानंतर स्वत: रतन टाटाही युजरच्या बचावासाठी पुढे आले आणि त्यांनी ट्विट केले.

त्यांनी लिहिले, “आपल्या सर्वांमध्ये एक लहान मूल आहे.” कृपया याना आदराने वागवा. यासह, त्यांनी आपल्या टिप्पणीमध्ये स्माईलहा इमोजी देखील वापरला.आतापर्यंत ४००० हून अधिक लोकांना रतन टाटाची ही टिप्पणी आवडली असून लोक या टिप्पणीवर त्यांचे कौतुक करत आहेत.

 

Leave a Comment