हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशाचे दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यानंतर संपूर्ण देश दुःखात बुडालेला होता. अशातच आता रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टमध्ये त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यात आलेला आहे. रतन टाटा यांचे बंधू नोएल टाटा यांची उत्तराधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. नोएल हे पूर्वीच सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि टाटा ट्रस्ट मध्ये विश्वस्त होते. या टाटा समूहाच्या टाटा सन्समध्ये जवळपास 66 टक्के एवढी भागीदारी आहे. आता संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे. हे रतन टाटा यांचे बंधू असले, तरी त्यांची कार्यशैली ही रतन टाटा पेक्षा खूप वेगळी आहे. प्रसिद्धीपासून ते नेहमीच दूर राहिले आहे. आता इथून पुढे रतन टाटा यांचा वारसा तेच चालवणार आहे. बुधवारी रतन टाटा यांचे निधन झाले. तसेच गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आणि त्यानंतर या नवीन अध्यक्षाची निवड करण्यात आलेली आहे.
टाटा आडनाव असलेली व्यक्ती या टाटा समूहाचा अध्यक्ष असावी, अशी असा पारसी समाजाचा आग्रह होता. तर रतन टाटा यांनी मात्र टाटा आडनाव असलेली व्यक्ती या पदावर असेल असे नाही. असे यापूर्वी देखील सांगितलेले होते. नोएल टाटा या अगोदरच टाटा समूहाचे संबंधित कार्यरत होते. त्यामुळे या पदावर त्यांचीच निवड होणार. हे जवळपास निश्चित होते. सध्या टाटा ट्रस्टमध्ये दोन उपाध्यक्ष आहे. यामध्ये टीव्ही एस के वेणू श्रीनिवासम आणि माजी संरक्षण सचिव विजयसिंह यांचा समावेश आहे हे दोघेही 2018 पासून कार्यरत आहे.
टाटा समूहात नवीन व्यक्तीची संचालक पदी निवड झालेली आहे. आणि ही व्यक्ती सर्वानुमते योग्य असल्याचा दावा देखील करण्यात आलेला आहे. रतन टाटा यांनी त्यांच्या आयुष्यात लग्न केले नाही. त्यामुळे त्यांचा हा कारभार सांभाळण्यासाठी त्यांची मुले किंवा त्यांची पत्नी नसल्याने पर्यायाने त्यांच्या बंधूचीच यासाठी निवड होईल, अशी सगळ्यांनाच अपेक्षा होती. आणि त्यांचा अपेक्षेप्रमाणे इथून पुढे टाटा समूहाचा डोलारा त्यांचे बंधू नोएल सांभाळणार आहेत.