हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही महिन्यांपासून रेशन कार्डधारकांसाठी केवायसी (KYC) प्रक्रिया सुरू आहे. सरकारने या प्रक्रियेसाठी एक ठराविक कालावधी निश्चित केला होता. परंतु, अनेक लोकांना केवायसी पूर्ण करण्यात अडचणी येत होत्या. त्यावर विचार करून सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी सरकारने केवायसीची मुदत 1 महिना वाढवून 31 एप्रिल 2025 पर्यंत केली आहे. त्यामुळे लोकांना अधिक वेळ मिळेल आणि प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी मिळेल. तर चला रेशन कार्डधारकांसाठी केवायसी प्रक्रिया विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
रेशन कार्ड केवायसीची तारीख वाढली –
सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी केवायसी प्रक्रिया पुन्हा एकदा वाढवली आहे. विभागीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, चौथ्या वेळेस ही मुदतवाढ केली गेली आहे. मात्र, ही शेवटची संधी असणार आहे. यानंतर रेशन कार्ड केवायसीसाठी कोणतीही अतिरिक्त मुदत दिली जाणार नाही. त्यामुळे, रेशन कार्डधारकांना 30 एप्रिल 2025 पर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. या तारखेनंतर, ज्यांचा केवायसी पूर्ण होणार नाही, त्यांचे मिळणारे मोफत धान्य बंद होणार आहे अन रेशन कार्ड रद्द होईल.
सध्या, 5 लाखांपेक्षा जास्त रेशनकार्डधारकांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. तसेच अनेक भागात हीच परिस्थिती असल्याचं दिसून येत आहे. अन त्यामुळेच हि मुदतवाढ करण्यात आली आहे. तर हि केवायसी कधी करावी ते आपण पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात –
केवायसी प्रक्रिया ऑनलाइन अन ऑफलाइन दोन्ही पद्धतीने केली जाऊ शकते.
ऑफलाइन पद्धत – रेशन कार्ड दुकानात जाऊन तिथे तुमच्या रेशन कार्डाची प्रत आणि आधार कार्ड दाखवून बायोमॅट्रिक पद्धतीने व्हेरिफिकेशन करा.
ऑनलाईन पद्धत – ऑनलाइन केवायसी करण्यासाठी, “मेरा KYC” आणि “Aadhaar Face RD” अँप डाउनलोड करा.
अँपमध्ये तुमचे स्थान (Location) निवडा, उदाहरणार्थ, महाराष्ट्र निवडा.
त्यानंतर, तुमचा आधार नंबर टाका.
आधार नोंदणीच्या आधारावर तुमचा फेस व्हेरिफिकेशन होईल अन केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.
तर, तुमचा केवायसी अजून बाकी असेल तर, ही मुदतवाढ तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे.