Ration Card : स्थलांतरित कामगारांना मिळणार ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’चा लाभ, 32 राज्यात झाला विस्तार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील अनेक राज्यांतील हजारो मजूर आणि कामगार इतर राज्यात रोजगारासाठी जातात. कोरोना संकटामुळे लॉकडाऊन कालावधीत लाखो कामगारांसमोर जेवणाचा प्रश्न उभा होता. कामगारांच्या या समस्या डोळ्यासमोर ठेवून सर्व राज्यांत ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ सिस्टम राबविण्यास सरकारकडून प्रोत्साहन देण्यात आले. श्रमिक, मजूर, शहरी गरीब, नोकर यासारख्या लोकांना या सिस्टमचा थेट लाभ मिळेल. या अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देशातील कोणत्याही भागातून घेण्यास हे कर्मचारी सक्षम होतील. हि लोकं फेअर प्राइस शॉपवर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल (POS) वरून खाण्याचा कोटा घेण्यास सक्षम असतील.

वन नेशन वन रेशनकार्ड सिस्टमचा एक फायदा
वन नेशन वन रेशनकार्ड सिस्टम राबविण्यामागील मोदी सरकारचा हेतू असा आहे की, प्रत्येकाला त्यांच्या कोट्याचे धान्य मिळावे. यासाठी पात्र लाभार्थ्यांची ओळख पटवण्याबरोबरच बनावट, डुप्लिकेट किंवा अपात्र कार्डधारकांची ओळख पटविणेही राज्यांना सोपे जाईल. लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे रेशनकार्डशी जोडलेले आहे. यानंतर बायोमेट्रिकच्या माध्यमातून त्यांच्या कोट्यातील धान्य लाभार्थ्यांना दिले जाते. जर राज्य सरकारने आपल्या सर्व लाभार्थ्यांचे आधार कार्ड रेशन कार्डशी जोडले आणि सर्व फेयर प्राइस सेल नऑटोमेशनमध्ये यश संपादन केले तर ते खुल्या बाजारातून जीडीपीच्या 0.25 टक्के जादाचे कर्ज घेऊ शकतात.

32 राज्यात विस्तार
मोदी सरकारची ही योजना आता 32 राज्यात विस्तारली आहे. चार राज्ये त्यांचे नेटवर्क डिजिटल बनवण्याच्या प्रक्रियेत आहेत. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार पश्चिम बंगाल, दिल्ली, छत्तीसगड आणि आसाममध्ये त्याची डिजिटल सिस्टीम अद्याप लागू केलेली नाही. मात्र दिल्ली आणि पश्चिम बंगाल डिजिटल सिस्टीम साठी पूर्णपणे तयार आहेत.

‘मेरा रेशन’ अ‍ॅप
अन्य राज्यांच्या रेशनकार्डधारकांच्या सोयीसाठी केंद्राने ‘मेरा रेशन’ (Mera Ration App) हे मोबाइल अ‍ॅप सुरू केले आहे. हे अ‍ॅप रेशनकार्ड धारकांना, विशेषत: इतर राज्यांतील रेशनकार्ड धारकांना, त्यांच्या स्थलांतरित क्षेत्रात जवळचे सरकारी स्वस्त धान्याचे दुकान ओळखण्यासाठी, त्यांची पात्रता किंवा कोटा तपशील तपासण्यास आणि अलीकडील व्यवहारांची माहिती मिळविण्यात मदत करेल.

या लोकांना याचा फायदा होईल
या ऑफरनंतर अन्न सचिव सुधांशु पांडे म्हणाले ,”की नवीन मोबाइल अ‍ॅपचा उद्देश एनएफएसएच्या लाभार्थी, विशेषत: स्थलांतरित लाभार्थी, रास्त भाव दुकान किंवा रेशन शॉप विक्रेते आणि इतर भागधारकांमध्ये ओएनओआरसीशी संबंधित सेवा प्रदान करणे आहे जेणेकरून ते सोयीचे होईल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

 

Leave a Comment