राशन दुकानदारांचा संप मागे; आज पासून राशन वाटप सुरळीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद । अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाने आपल्या सहा मागणीसाठी 1 मे पासून संप पुकारला होता. शासनाने त्या सहा मागण्यांना पैकी दोन मागण्या मान्य केल्यामुळे संप मागे घेत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत महासंघाचे राज्याध्यक्ष डी.एन.पाटील यांनी केली. तसेच आज शनिवार 8 मे पासून मोफत व रेग्युलर कार्डधारकांना अन्नधान्य वाटप राज्यातील सर्व रास्त भाव दुकानातून सुरु करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी पाटील यांनी दिली आहे.

यावेळी बोलताना पाटील यांनी सांगितले की, “सध्या रमजान महीना व कोरोना महामारी सुरु असल्याने संप करुन कार्डधारकांना वेठीस धरणे उचित होणार नाही सध्या अन्नधान्याची अत्यंत गरज आहे. संप मागे घेवून जनतेस सहकार्य करावे असे महासंघाला खा.इम्तियाज जलील यांनी कळवले. अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मागणीबाबत लवकर निर्णय घेण्याची विनंती केली होती. आमदार अंबादास दानवे, आमदार संजय सिरसाट यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासोबत एक बैठक महासंघासोबत घेवून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले. मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, मा.खा.प्रतापराव पाटील, मा.खा.हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री सोबत मागण्या मान्य करण्यासाठी बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. सतेज पाटील, राजेंद्र पाटील येडारावकर यांनी सुध्दा मंत्रालयात मागणी सोडवण्यासाठी प्रयत्न केला. आ.अतुल सावे, आ.प्रदीप जैस्वाल यांनीही प्रयत्न केले”.

संपकाळात कार्डधारकांना जो त्रास झाला त्याबद्दल महासंघाने दिलगिरी व्यक्त केली आहे. यावेळी कार्याध्यक्ष मधुकर चव्हाण, उपाध्यक्ष अनिता मंत्री, मिलिंद शेळके, ललित पाटणी, रशीद मामू, प्रकाश निकाळजे, राहुल हिवराळे, सचिन करोडे, बाबासाहेब इंगळे उपस्थित होते.

Leave a Comment