Ratnagiri News : एकाच कुटुंबातील तिघे समुद्रात बुडाले!! रत्नागिरीतील घटनेनं खळबळ

Ratnagiri News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ratnagiri News । नाताळ आणि नववर्षाच्या निमित्तान सध्या अनेक पर्यटन पर्यटनाला निघाले आहेत. कोकणातील समुद्र किनाऱ्यावर गर्दीची लाट उसळली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतापूर्वी जुन्या वर्षात मनोसक्त मजा करण्याचा अनेकांचा मानस असतोच. परंतु आता हीच मजा एका कुटुंबाच्या जीवावर बेतली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये पर्यटनासाठी गेलेले मुंबईचं एक कुटुंब समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळं रत्नागिरीत मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं? Ratnagiri News

मुंबईच्या पवई परिसरात राहणारे मिथ्या कुटुंबिय पर्यटनासाठी कोकणात दाखल झाले होते. यावेळी गुहागरच्या समुद्रात पोहण्याचा आनंद घेत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. दुपारी 12.30 च्या दरम्याने वरचा पाट बाजूच्या समुद्रकिनाऱ्यावर अमोल विजयकुमार मुथ्थू आपली पत्नी श्वेता व तेरा वर्षाचा मुलगा विहान याच्या समवेत समुद्रात पोहत होते. समुद्रात पोहण्याचा आनंद घेत असतानाच ते 80 मीटर खोल समुद्रामध्ये पोहत गेले आणि तिघेही बुडाले. त्यावेळी उपस्थित असलेल्या एका पर्यटकाचायच्या ते लक्षात आलं. त्याने तातडीने याबाबत गुहागर नगरपंचायत आणि तहसीलदार यांना कळवलं. गुहागर समुद्रकिनाऱ्यावर जीव रक्षक म्हणून काम करणारे प्रदेश तांडेल याला माहिती कळताच त्याने गुहागर वॉटर स्पोर्ट च्या कर्मचाऱ्यासह तातडीने सुमारे एक किलोमीटर अंतर पार करत बुडणाऱ्या तिघांना पाण्याबाहेर काढले. Ratnagiri News

पत्नी श्वेता अमोल मुथ्थू, वय 42, मुलगा विहान अमोल मुथ्थू, वय 13 या दोघांचे प्राण वाचले मात्र 42 वर्षीय अमोल मुथ्या यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अथक परिश्रमानंतरही अमोल यांना वाचण्यात स्थानिकांसह पोलिसांना अपयश आले. अमोल यांची कुटुंबासोबतची ही ट्रीप त्यांच्या आयुष्यातील शेवटची ट्रीप ठरली. समुद्रावर पोहण्याचा आनंद लुटताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांची पत्नी मुलगा या दोघांनाही या संपूर्ण घटनेमुळे जबर धक्का बसला आहे. गुहागर समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. मात्र अशा प्रकारच्या घटनेने पर्यटनाला गालबोट लागते. खरं तर खोल समुद्रात अंघोळीसाठी जाऊ नये अशा सूचना करूनही अनेक जण समुद्रामध्ये जातात आणि इथेच घात होतो.