‘आदित्य ठाकरेंचं नाव ‘पप्पू’ आहे, तर उद्धव ठाकरेंचं…’, रवी राणांची ठाकरे पिता- पुत्रांवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र महाराष्ट्र – आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राज्यभरातील मंत्री आणि आमदार अधिवेशनासाठी नागपूरला रवाना झाला आहेत. या अधिवेशनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना आमदार आदित्य ठाकरेदेखील नागपूरला रवाना झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हणाले रवी राणा?
उद्धव ठाकरे यांचं नाव ‘बापू’ आहे, तर आदित्य ठाकरे यांचं नाव ‘पप्पू’ आहे. त्यांनी अधिवेशनाचं कामकाज व्यवस्थितपणे पार पडू द्यावं. त्यांनी कुठल्याही प्रकारचा गोंधळ घालू नये, राजकारण करू नये, अशी टीका रवी राणांनी (Ravi Rana) केली. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून टीका करणारा व्हिडिओ शेअर केला आहे.

सुनील प्रभूंवरदेखील केली टीका
आज सुनील प्रभू सभागृहात बोलले की, मंत्रिमंडळासाठी बांधलेल्या बंगल्यांची साफ-सफाई करण्यासाठी मोठा खर्च केला.अरे तुम्ही कधी विदर्भात अधिवेशन घेतलं नाही. तुमचे मंत्री कधी इकडे आले नाहीत. तुम्ही कधी त्या बंगल्यांमध्ये थांबले नाहीत. तुमची अडीच वर्षाची धूळ साफ करणं गरजेची होती, म्हणून सगळे बंगले स्वच्छ केले. आता याठिकाणी अनेक मंत्री थांबून विदर्भातील जनतेला न्याय देण्याचं काम करत आहेत,” असा टोला रवी राणांनी (Ravi Rana) यावेळी सुनील प्रभू यांना लगावला आहे.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या