वाढदिवसा दिवशी आमदार रवी राणांनी जपले सामाजिक भान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी |आशिष गवई 

अमरावती शहर व ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या दुष्काळ ग्रस्त गावात व शहरातील प्रभागात पिण्याच्या पाण्याच्या २५ टँकर द्वारे आमदार रवी राणा यांनी सकाळपासून पिण्याच्या पाण्याचे केले वाटप – जनावरांना पिण्यासाठी सुद्धा शहरातील व गावातील विहिरीत तसेच हौदा हौदात केला टँकरने पाणी पुरवठा केला.

जल है तो कल है असे म्हणत वाढदिवसा निमित्य आमदार रवी राणा यांचा मोलाचा संदेश.आमदार रवी राणा यांच्या वाढदिवसा निमित्य सकाळी अंबा देवी व एकविरा देवी मंदिरात महाआरती संपन्न – आमदार रवी राणा यांची प्रमुख उपस्थिती – यावर्षी शेतकऱ्यांच्या शेतासाठी व सर्वसामान्य जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी जास्तीत जास्त पाऊस पडावा तसेच शेतकरी दुष्काळमुक्त होऊन शेतकरी शेतमजूर व सर्व सामान्य नागरिकांच्या घरी सुख समृद्धी लाभावी या करिता आमदार रवी राणा यांनी महाआरती करून अंबादेवी व एकविरादेवीला केली प्रार्थना – इर्विन व डफरीन तसेच पी.डी.एम.सी. रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप तसेच थंड ताकाचे वाटप तसेच १३२५ लहान मुलांना बॅट व बॉलचे केले वाटप केले.

मधुबन वृद्धाश्रम व मातोश्री वृद्धाश्रम येथील वृद्धांना स्नेहभोजन देऊन वृद्धांसोबत स्वतः पंगतीत बसून आमदार रवी राणा यांनी केले जेवण.संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील गावागावात युवा स्वाभिमान पार्टी परिवाराच्या वतीने आमदार रवी राणा यांचा वाढदिवस जनसेवा दिवस म्हणून विविध सामाजिक उपक्रमाने झाला साजरा.

Leave a Comment