मुंबई प्रतिनिधी । भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. ही निवड पुढील दोन वर्षांसाठी असेल. शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन वर्षात संघाने भरीव कामगिरी केली आहे. यंदाच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ हा उपांत्य फेरीपर्यंत पोहचला होता.
प्रशिक्षक निवड समिती मध्ये भारतीय संघाचे माजी कप्तान कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि महिला क्रिकेटपटू शांता रंगस्वामी यांचा समावेश होता. भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी रॉबिन सिंग, लालचंद राजपूत, माइक हसन व टॉम मूडी यांनी देखील अर्ज केले होते. या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांकावर शास्त्री राहिले तर अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर माइक हसन व टॉम मूडी राहिले.
Cricket Advisory Committee member @therealkapildev says the decision to reappoint @RaviShastriOfc as #TeamIndia‘s Head Coach was unanimous. pic.twitter.com/3CXL0BF7nJ
— BCCI (@BCCI) August 16, 2019
The CAC reappoints Mr Ravi Shastri as the Head Coach of the Indian Cricket Team. pic.twitter.com/vLqgkyj7I2
— BCCI (@BCCI) August 16, 2019