रविकांत तुपकर परतले ‘स्वगृही’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । ‘स्वाभिमानी शेतकरी संघटना’ सोडून ‘रयत क्रांती संघटने’त गेलेल्या रविकांत तुपकर यांनी अवघ्या १९ दिवसात यु टर्न घेत पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत घरवापसी केली. संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी त्यांच्या छातीवर बिल्ला लावून त्यांना पुन्हा प्रवेश दिला. ‘स्वभिमानी संघटने’त असलेल्या अंतर्गत मतभेदातून संघटना सोडल्या’चं रविकांत तुपकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

दरम्यान ‘संघटना सोडल्यानंतर राजू शेट्टी आणि इतर शेतकरी नेत्यांवर आपण टीका न करण्याची भूमिका घेतली होती. शिवाय राजू शेट्टी यांच्याशीही आपला संपर्क सुरू होता.

आता संघटनेतील मतभेद मिटले असून पुन्हा एकदा चळवळीत जोमाने काम करणार असल्या’चं त्यांनी स्पष्ट केले. तसेच ‘रयत क्रांती संघटने’त कोणतीही अपेक्षा न ठेवता गेलो होतो. याचा वेगळा अर्थ निघू नये म्हणून निवडणूक होण्यापूर्वीच स्वगृही परातल्या’चे त्यांनी नमूद केले आहे.

Leave a Comment