अभिनेत्री रविना टंडन बनली ‘उद्यान राजदूत’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अमित येवले

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची “उद्यान राजदूत अर्थात पार्क ॲम्बॅसिडर” म्हणून काम करण्यास अभिनेत्री रविना टंडन हिने मान्यता दिली आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतचा प्रस्ताव रवीनाला दिला होता. त्याचा स्वीकार करत स्वीकृतीचे पत्र तिने वनमंत्र्यांना पाठवले आहे.
१०३ चौरस किलोमीटरच मुंबईसारख्या महानगरातलं हे सुंदर जंगल, भेट देणाऱ्या पर्यटकाच्या मनावर गारूड घातल्याखेरीज रहात नाही. हे शहरातलं जंगल आहे. पण शहरातील धकाधकीच्या आयुष्यात खास करून मुंबईकरांच्या जीवनाला हे वन जगण्याचा एक समृद्ध आरोग्यदायी श्वास देतं. त्यामुळेच त्याला मुंबईचं फुफ्फुस असं देखील म्हणतात.

काय आहे नेमकं या उद्यान्यात –

  • या उद्यानात २७४ पेक्षा अधिक पक्षांच्या प्रजाती आढळतात.

  • प्राण्यांच्या ३५, सरपटणाऱ्या आणि उभयचर प्राण्यांच्या ७८, फुलपाखरांच्या १७० प्रजाती इथे आढळतात.

  • उद्यानात ११०० पेक्षा अधिक वृक्ष प्रजाती आहेत.

  • उद्यानाच्या मध्यभागी बौद्धकालीन कान्हेरी गुंफा आहेत.

  • हे जंगल मुक्तपणे विहार करणाऱ्या बिबट्यांचे देखील घर आहे.

Leave a Comment