हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यामध्ये लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून सर्वांचे लक्ष पुणे मतदारसंघाकडे लागून राहिले होते. कारण की, या मतदारसंघातून काँग्रेसने रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar);यांना भाजपने मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना आणि वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरेंना (Vasant More) उमेदवारी जाहीर केले होती. अखेर आज लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांचा विजय झाला असल्याचे समोर आले आहे. त्यांनी रवींद्र धंगेकरांचा पराभव केला आहे.
यंदा पुणे मतदार संघामध्ये या तिन्ही पक्षाकडून चांगलीच लढत पाहिला मिळाली. महत्वाचे म्हणजे, याच लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेकडून वसंत मोरे यांना तिकीट न देण्यात आल्यामुळे त्यांनी वंचितमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर वंचितकडून पुणे मतदारसंघासाठी वसंत मोरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तसेच गेल्या निवडणूकीत पुणे मतदारसंघात गिरीश बापट यांनी विषय मिळाल्यामुळे त्यांची जागा राखण्याचे काम भाजपच्या हाती होते. यामुळे त्यांनी या मतदारसंघातून मोहोळ यांना तिकीट दिले.
तर दुसऱ्या बाजूला कसबा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले होते. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ सर्वात चर्चेत राहिला होता. अखेर आज मतमोजणी झाल्यानंतर पुणे मतदारसंघावर मोहोळ यांचा शिका उमटला असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा विजय भाजपसाठी अतिशय महत्त्वाचा आणि काँग्रेससाठी धक्कादाय ठरला आहे.