T-20 World Cup मध्ये ‘हा’ ऑलराउंडर घेऊ शकतो रविंद्र जडेजाची जागा! रोहित-द्रविडचाही आहे फेव्हरेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा हा T-20 (T-20 World Cup) आणि वनडे सामन्यांतील एक उत्तम खेळाडू म्हणून ओळखला जातो. जडेजा फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही संघात अगदी परफेक्ट बसतो. असे असताना कर्णधार रोहित शर्माने रवींद्र जडेजाला वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात संघाबाहेर केले. त्याच्या जागी एका धडाकेबाज खेळाडूला संधी देण्यात आली. या खेळाडूने आपल्या खेळीने सर्वांनाच प्रभावित केले. त्यामुळे हा खेळाडू आगामी T-20 विश्वचषकात (T-20 World Cup) रवींद्र जडेजाची जागा घेण्याची शक्यता आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि हा खेळाडू कोण आहे ? तर या खेळाडूचे नाव आहे दीपक हुडा. दीपक हा रवींद्र जडेजाप्रमाणेच गोलंदाजी आणि फलंदाजी करतो. दीपक हा काही चेंडूंतच सामन्याचा (T-20 World Cup) निकाल पलटवण्यात तरबेज आहे. आणि त्याने हे आपल्या खेळीने सिद्ध केले आहे. महत्वाचे म्हणाजे, तो कुठल्याही गोलंदाजाला फोडून काढू शकतो. तो सुरुवातीला क्रीजवर टिकून खेळतो. यानंतर तो एकदा खेळपट्टीवर सेट झाला कि तो मोठी खेळी करू शकतो. आणि विशेष म्हणजे तो कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो.

T-20 वर्ल्ड कपसाठीचा मोठा दावेदार
दीपक हुडा हा आगामी T-20 वर्ल्ड कपसाठीचा (T-20 World Cup) मोठा दावेदार असल्याचे मानले जात आहे. तो कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडचाही फेव्हरेट आहे. दीपक हुडा हा आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळतो. त्याने अनेक मॅच विनिंग खेळीने आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?