Sunday, March 16, 2025
Home ताज्या बातम्या यामुळे विरोधक गठबंधनाच्या नावाखाली एकत्र : रावसाहेब दानवे

यामुळे विरोधक गठबंधनाच्या नावाखाली एकत्र : रावसाहेब दानवे

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे 

     लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजायला काही अवधी शिल्लक राहीला आहे.यनिमित्ताने सर्व पक्ष आपापल्या बूथ स्तरावर जोमाने काम करत आहेत. भाजपकडून ही यनिमित्ताने बूथ, शक्ति केंद्रीय सदस्य , कार्यकारणी यांच्या मेळाव्याचे आयोजन केले जात आहे.
.
     आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप सत्तेत आल्यास पुढची ५० वर्ष सत्ता मिळणार नाही या धास्तीनेच सर्व विरोधक एकत्र आल्याची टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी निवडणुकीस सज्ज व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.  सांगलीत धनंजय गार्डन येथे पंतप्रधान संवाद संघटन कार्यक्रमानिमित्त भाजपच्या बूथ आणि शक्ती केंद्र सदस्यांचे तसेच कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, विलासराव जगताप, सुरेश हाळवणकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, महापौर संगीता खोत उपस्थित होत्या. .
        यावेळी दानवे म्हणाले, निवडणूका जवळ येवू लागताच भाजपला पराभूत करण्यासाठी नवीन आघाड्या होवू लागल्या आहेत. ज्यांचे कधी आपसात जमले नव्हते ते एकत्र येताहेत. पाच वर्षात देशाची प्रगती झाल्याने २०१९ च्या निवडणुकीत भाजप जिंकल्यास पुढची ५० वर्ष सत्ता मिळणार नाही या धास्तीने ते एकत्र येत आहेत.’  ते म्हणाले, “राज्यात भाजप चौथ्या क्रमांकावर होती. २०१४ च्या निवडणुकीनंतर राज्यात जेवढ्या निवडणुका झाल्या त्यातील अपवाद वगळता सगळ्या भाजपने जिंकल्या. आज भाजपचे दहा हजार सरपंच, १८ महापालिका, ९० नगरपालिका, १० जिल्हा परिषदा, १२३ आमदार आणि २३ खासदार असून राज्यात पक्ष एक नंबरचा बनला आहे.’ दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी येत्या सात किंवा आठ मार्चला आचारसंहिता लागू होण्याची शक्‍यता प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी वर्तवली. फिर एक बार मोदी सरकारचा नारा जनतेपर्यंत पोचवा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी केले.