Rawalpindi Cricket Stadium Attack : रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम उध्वस्त! आज होणार होती PSL ची मॅच

Rawalpindi Cricket Stadium Attack
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Rawalpindi Cricket Stadium Attack । पाकिस्तानच्या छुप्या हल्ल्याला जशास तस प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने पाकिस्तानची रडार सिस्टिम उद्ध्वस्त केली आहे. भारतीय वायूदलाने ड्रोनचा वापर करुन थेट पाकिस्तानच्या लाहोर, कराची, रावळपिंडी यांसारख्या महत्वाच्या शहरात ड्रोन हल्ला केला आहे. या ड्रोन हल्ल्यात पाकिस्तानातील प्रसिद्ध रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम उध्वस्त झालं आहे. महत्वाची बाब म्हणजे पाकिस्तान सुपर लीग 2025 स्पर्धेतील आजचा सामना याच स्टेडियम वर खेळवण्यात येणार होता. त्यामुळे हा सामनाही रद्द करण्यात आला असल्याचं बोललं जातंय.

पाकिस्तानी मीडियाच्या दाव्यानुसार, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमजवळ एक ड्रोन कोसळल्याचे (Rawalpindi Cricket Stadium Attack) वृत्त आहे, ज्यामध्ये २ नागरिक जखमी झाले आहेत. या ड्रोन हल्ल्यात स्टेडियमला ​​लागून असलेल्या एका रेस्टॉरंट इमारतीचे थोडेसे नुकसान झाले. अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसर सील केला आहे. ड्रोनचा शोध घेण्याचं काम सुरु असून जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रावळपिंडी व्यतिरिक्त, पाकिस्तानची आर्थिक राजधानी मानली जाणाऱ्या कराची मध्येही ड्रोनव्दारे स्फोट झाला आहे. कराचीमध्येच पाकिस्तानच अणवस्त्र बॉम्ब स्टोर आहे. त्यामुळे या ड्रोन ब्लास्टमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे. लाहोरमधील नौदलाच्या तळाजवळ सुद्धा ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तान मध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. नागरिकांची पळापळ सुरु आहे.

पेशावर झल्मी आणि कराची किंग्जमध्ये होणार होता सामना- Rawalpindi Cricket Stadium Attack

दरम्यान, रावळपिंडी स्टेडियमवर आज कराची किंग्ज विरुद्ध पेशावर झल्मी यांच्यात सामना होणार होता, परंतु हा सामना आता रद्द झाल्याचं बोललं जातंय. कराची किंग्ज आणि पेशावर झल्मीच्या संघात अनेक परदेशी खेळाडू आहेत. कर्णधार डेव्हिड वॉर्नर व्यतिरिक्त, कराची किंग्जकडे मोहम्मद नबी, जेम्स विन्स, टिम सेफर्टसारखे परदेशी खेळाडू आहेत. तर दुसरीकडे पेशावर झल्मीच्या संघात टॉम कोहलर कॅडमोर, ल्यूक वूड, अल्झारी जोसेफ, मॅक्स ब्रायंट सारखे खेळाडू आहेत. या सर्व खेळाडूंची सुरक्षा धोक्यात आली आहे. परिस्थितीचे गांभीर्य बघता इंग्लंडच्या खेळाडूंनी त्यांच्या देशाच्या क्रिकेट बोर्डाला लवकरात लवकर पाकिस्तानातून बाहेर काढण्याची विनंती केली आहे.