ऐट राजाची वागणुक भिकाऱ्याची अशी सरकारची अवस्था, सदाभाऊंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भाजपश इतर पक्षांतील नेत्यांकडून वारंवार निशाणा साधला जातोय. आता माजी मंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ” महाविकास आघाडी सरकारने मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या शेतात गाढवाचा नांगर फिरविला आहे. ऐट राजाची वागणुक भिकाऱ्याची अशी सरकारची अवस्था झाली असल्याची घणाघाती टीका खोतांनी केली आहे.

सदाभाऊ खोत यांनी माध्यमंही संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महापूर आणि अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्री ठाकरेंनी काल जे मदतीचा जीआर काढला आहे. राज्य सरकारच्या विरोधात आपण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही परिषद घेणार आहे. त्या जीआरची किसान परिषदेत होळी करणार आहे.

राजू शेट्टींच्या मिशीला शरद पवारांचे आमरस – खोत

शेतकऱ्यांच्या ऊस दराच्या समस्येवर आंदोलन करणारे राजू शेट्टी यांच्यावर यावेळी सदाभाऊ खोत यांनी टीका केली. आत्तातरी तुम्ही शरद पवार यांच्या माडीवरून खाली उतरणार का? आमच्या मिशीला खरकट लागलं नाही अस काहीजण बोलत आहेत, पण त्याच्या मिशीला शरद पवार यांचे आमरस लागलं असल्याचे खोत यांनी म्हंटले आहे.

You might also like