रायगडाला जेंव्हा जाग येते… पुण्याचा ‘ श्रीश ‘ बनला छत्रपती राजाराम महाराज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

केंद्रीय आयुषमंत्र्याची बाल कलाकार श्रीशच्या पाठीवर कौतुकाची थाप…

  पुणे प्रतिनिधी | गोवा येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनय, टायमिंग , संवाद फेक व व्यासपीठावरील आत्मविश्वासाने बालकलाकार श्रीशच्या पाठीवर केंद्रीय आयुषमंत्री श्रीपादजी नाईक यांनी कौतुकाची थाप देऊन विशेष सत्कार केला. यावेळी उपस्थित पध्मश्री प्रसादजी सावकार , गोव्याचे जलस्त्रोत मंत्री विनोद पालयेकर, स्वप्नीलजी नाईक हे तसेच उपस्थित नागरिकांनी भावनाविवश होऊन बालकलाकाराला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच गोवा विधानसभेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांनी सुद्धा श्रीशचे विशेष कौतुक केले.

रायगडाला जेंव्हा जाग येते यातील राजाराम महाराजांची भूमिका पार पाडणाऱ्या श्रीश ला पाहुन यावेळी आयुषमंत्री नाईक हे भावनिक झाले होते. छत्रपती राजाराम महाराजांचा इतिहास आणि त्यांची कार्यपद्धती हे सर्व डोळ्यासमोर श्रीश ने डोळ्यासमोर उभं केलं. श्रीश हा येत्या काळात महाष्ट्रातला मोठा कलावंत होईल अस भाकित त्यांनी वर्तवल. त्याची कलेप्रतिची जिद्द आणि मेहनत त्याला एक दिवस नवी ओळख निर्माण करेल यात शंका नाही अस म्हणत त्यांनी श्रीश चं कौतुक केलं. आणि त्याला भावी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

श्रीश राजेंद्र खेडकर हा बालकलाकार अभिनव शाळा, एरवंडणा, इयत्ता ४ थी मध्ये असून गेल्या ३,४ वर्षापासून त्याची कलेकड़े असणारी ओढ़ पाहुन त्याला शाळा पातळी आणि विविध स्पर्धा नाटक, पोवाड़ा स्पर्धा यांत वडील राजेंद्र खेड़कर हे त्याच्यातील कलागुणाना वाव देत आहेत.  श्रीश ने अनेक नाटक आणि मराठी चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं आहे.

Leave a Comment