RBI 90 Quiz : RBI देतेय 10 लाख रुपये जिंकण्याची संधी; फक्त सोडवा ‘ही’ प्रश्नमंजुषा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

RBI 90 Quiz । बातमीचे नाव ऐकूनच तुम्हाला वेगळं काहीतरी वाटेल, पण होय हे खरं आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank Of india) १० लाख रुपये जिंकण्याची संधी देत आहे. मात्र त्यासाठी तुम्ही पदवीधर असं आवश्यक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ९० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी देशव्यापी स्पर्धा (RBI 90 क्विझ) आयोजित केली जात आहे. या स्पर्धेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थी 10 लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस जिंकू शकतात. त्यासाठी तुम्हाला एक प्रश्नमंजुषा सोडवावी लागेल जी जनरल नॉलेजवर आधारित असेल .

RBI 90 क्विझ (RBI 90 Quiz) ही परीक्षा आयोजित करण्यासाठी, RBI ने 20 ऑगस्ट 2024 रोजी ‘RBI90Quiz’ नावाचा प्लॅटफॉर्म सुरू केला. याविषयी बोलताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, या प्रश्नमंजुषा परीक्षेद्वारे देशातील तरुणांना आरबीआय आणि देशाच्या वित्त परिसंस्थेबद्दल माहिती मिळेल. या परीक्षेत पहिला क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस मिळेल, दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला 8 लाख रुपये आणि तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या विद्यार्थ्याला 6 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. हि स्पर्धा राज्यस्तरावर सुद्धा आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला दोन लाख रुपये, दुसऱ्या नंबरला दीड लाख रुपये आणि तृतीय क्रमांक असणाऱ्या विद्यार्थ्याला एक लाख रुपये बक्षीस मिळेल.

पात्रता काय? RBI 90 Quiz

RBI द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या RBI 90 प्रश्नमंजुषासाठी भारतातील महाविद्यालयांमधून पदवीधर झालेले विद्यार्थी पात्र असतील. मात्र ज्या विद्यार्थ्यांचे वय 1 सप्टेंबर 2024 पर्यंत 25 वर्षे पूर्ण झालेले नाहीत तेच विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. 20 ऑगस्टपासून या स्पर्धेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून ती 17 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.