RBI ला कोरोनाचा फटका, गव्हर्नर शक्तिकांत दास कोरोना पॉझिटीव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व बॅंकचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण झाली आहे. विलगीकरणात राहुन ते रिझर्व बॅंकेचे काम सुरुच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. इतरांपासून स्वत:ला दूर ठेवून काम करत असल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितले. कोविड १९ चे लक्षण वाटत नाहीत पण त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना सावध केलंय. (RBI Governor covid positive)

”माझी कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आलीय. बाह्य लक्षणांनी असं वाटत नाहीय. माझी तब्येतही ठीक आहे. पण माझ्या संपर्कात आलेल्यांना सतर्क करु इच्छितो. लोकांपासून दूर राहुन मी काम सुरु ठेवेन असे ट्वीट शक्तिकांत दास यांनी केले. सर्व डेप्युटी गव्हर्नर आणि इतर अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्स आणि फोनवरुन संपर्कात राहीन” असेही ते म्हणाले. रिझर्व बॅंकेत बीपी.कानूनगो, एमके जैन, एमडी पात्रा आणि एम राजेश्वर राव हे चार डेप्युटी गव्हर्नर आहेत.

अर्थव्यवस्था आणि शेअर बाजार सुस्थितीत राहण्यासाठी ते लॉकडाऊन आणि त्यानंतरच्या काळात विशेष सक्रीय राहीले. कोरोना संकटातून अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी पारंपारिक तसेच अपारंपारिक पद्धतींची मदत घेतली.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment