RBI Imposes Restrictions : RBI कडून महाराष्ट्रातील ‘या’ सहकारी बँकेवर निर्बंध; ग्राहकांना बसणार मोठा फटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (RBI Imposes Restrictions) भारतीय रिझर्व बँक (RBI) ही भारत सरकारने स्थापन केलेली मध्यवर्ती पतपेढी, मध्यवर्ती बँक आणि नियामक संस्था आहे. जी भारतीय रुपयांच्या जारी, पुरवठ्यासाठी आणि भारतीय बँकिंग प्रणालीच्या नियमनासाठी जबाबदार आहे. RBI देशभरातील प्रमुख पेमेंट सिस्टमचे व्यवस्थापन करते आणि त्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचे काम करते. या अधिकारांचा वापर करून भारतीय रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील काही सहकारी बँकांवर निर्बंध आणले आहेत.

नुकतेच आणखी एका सहकारी बँकेसंदर्भात RBI ने कठोर निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. (RBI Imposes Restrictions) ज्यामुळे या बँकेच्या ठेवीदारांना व्यवहारासाठी मोठी अडचण येण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया RBI ने कोणत्या बँकेवर निर्बंध लावले आहेत आणि त्यामुळे ग्राहकांवर काय परिणाम होणार आहे.

कोणत्या बँकेवर लावले निर्बंध?

नुकतेच RBI ने राज्यातील उल्हासनगर येथे असलेल्या कोणार्क अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लादून मोठी कठोर कारवाई केल्याचे समोर आले आहे. यामध्ये ग्राहकांना बँकेतून पैसे काढता येणार नाहीत. कारण RBI ने या बँकेतून पैसे काढण्यासह अनेक निर्बंध लादले आहेत.

का लावले निर्बंध? (RBI Imposes Restrictions)

माहितीनुसार, कोणार्क को- ऑपरेटिव्ह बँकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने या बँकेवर RBI ने निर्बंध लादल्याचे समजत आहे. दरम्यान, पात्र ठेवीदारांना डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून (DICGC) त्यांच्या ठेवींमधून ५ लाख रुपयांपर्यंत विमा दाव्याची रक्कम मिळू शकते, असे सांगण्यात आले आहे. बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ३५ए अंतर्गत कोणार्क अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेवर २३ एप्रिल २०२४ रोजी कामकाज बंद झाल्यापासून निर्बंध लागू करण्यात आले आहे.

ग्राहकांवर काय परिणाम झाले?

RBI ने लावलेल्या निर्बंधांमुळे ही बँक कोणत्याही ग्राहकाला कोणतेही कर्ज मंजूर वा त्याचे नूतनीकरण करू शकत नाही. इतकेच काय तर ग्राहक कोणतीही गुंतवणूक करू शकत नाहीत. (RBI Imposes Restrictions) कोणतेही दायित्व ट्रान्सफर करू शकत नाहीत. तसेच आरबीआयच्या परवानगीशिवाय बँकेच्या कोणत्याही मालमत्तेबाबत कुणीही निर्णय घेऊ शकत नाही.

RBI च्या म्हणण्यानुसार,

RBI ने म्हटले की, ‘कोणार्क को- ऑपरेटिव्ह बँकेची सध्याची रोख स्थिती लक्षात घेऊन सर्व बचत खाती, चालू खाती वा ठेवीदाराच्या इतर कोणत्याही खात्यातील एकूण शिल्लक रकमेतून कोणतीही रक्कम काढण्याची परवानगी देता येणार नाही. मात्र, कर्ज समायोजित करण्याची परवानगी आहे. (RBI Imposes Restrictions) निर्बंध लावले म्हणजे याचा अर्थ बँकेचा परवाना रद्द केल्याचे समजू नये. केवळ बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ही बँक निर्बंधांसह बँकिंग ऑपरेशन्स सुरू ठेवेल’.