RBI च्या पतधोरणाची बैठक तहकूब, लवकरच जाहीर केली जाणार नवीन तारीख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीची बैठक तहकूब करण्यात आली आहे. केंद्रीय बँकेने सोमवारी याबाबत माहिती दिली आहे. RBI एमपीसीच्या बैठकीची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल. यापूर्वी RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यांची आर्थिक धोरण बैठक 29 सप्टेंबरपासून सुरू होणार होती. या आर्थिक धोरण बैठकीत घेतलेले निर्णय 1 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार होते.

व्याजदरामध्ये बदल होण्याची शक्यता नाही

असे मानले जात आहे कि, किरकोळ महागाईच्या दर (Retail Inflation) वाढीमुळे या बैठकीत धोरणांच्या व्याजदरामध्ये (Policy Rates) कोणताही बदल होणार नाही. खरं तर, कोरोना संकटामुळे पुरवठा खंडित झाल्यामुळे किरकोळ महागाई वाढली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आधीच सांगितले आहे की, महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक आर्थिक कारवाई केली जाऊ शकते. ऑगस्टमध्ये किरकोळ महागाईचा दर जुलैमध्ये 6.73 टक्क्यांवरून घसरून 6.69 टक्क्यांवर आला आहे

5 ऑक्टोबर रोजी लोन मोरेटोरियमवर सुप्रीम कोर्टात सुनावणी

दुसरीकडे, लोन मोरेटोरियम प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयात C सुनावणी आज तहकूब करण्यात आली आहे. केंद्राच्या मागणीवर कोर्टाने पुढील सुनावणी 5  ऑक्टोबरला ठेवली आहे. अशा परिस्थितीत मोरेटोरियम कालावधीत बँकांकडून आकारल्या जाणाऱ्या व्याजावर पुढील 2-3 दिवसांत निर्णय येणे अपेक्षित आहे . स्थगित ईएमआयवरील व्याज आव्हान देणाऱ्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला निर्णय रेकॉर्डवर आणून संबंधित पक्षांना प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment