RBI Penalties | देशातील सर्व बँका आपापल्या परीने काम करत असतात. परंतु रिझर्व बँक ऑफ इंडियाचे या सगळ्या बँकांच्या कामकाजावर बारीक लक्ष असते. जेव्हा कोणतीही बँक आरबीआयच्या नियमांकडे दुर्लक्ष करते. आणि वेगळ्या पद्धतीने काम करते. तेव्हा मध्यवर्ती बँक त्यावर दंड आकारतात. अशातच आता नियमाचे भंग केल्याने भारतीय रिझर्व बँकेने तीन बँकांना चांगला दंड ठोठावला आहे.
रिझर्व बँक ऑफ इंडियाने (RBI Penalties) बँक ऑफ महाराष्ट्रला देखील नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणे दंड ठोठावला आहे. बँकेने त्यांची कर्जप्रणाली सायबर सिक्युरिटी आणि फ्रेमवर्क इन बँक क्रेडिट तसेच केवायसी याबाबतचे नियमांचे पालन केले नाही. म्हणूनच आरबीआयने हा दंड ठोठावला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रला 1,27,20,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
आरबीआयने (RBI Penalties) 31 मार्च 2023 पर्यंत सगळ्या बँकांची आर्थिक स्थिती नक्की कशी आहे याची तपासणी केली होती. तसेच मेमध्ये सर्व बँकांच्या माहिती तंत्रज्ञानाच्या माहितीची देखील तपासणी करण्यात आली होती. परंतु या तपासणी दरम्यान नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आरबीआयचे लक्षात आले. आणि त्यानंतर त्यांनी बँकांना नोटीस बजावून त्या बँकांनी नियमाचे पालन न केल्याबद्दल बँकेला जास्तीत जास्त दंड का लावू नये. अशी विचारणा केली होती.
यानंतर आरबीआयने असे सांगितले की, नोटीसला उत्तर दिल्यानंतर बँकांची वैयक्तिक तपासणी आणि वैयक्तिक सूचनावणी केली जाईल. आरबीआयला त्यानंतर असे आढळले की बँकांवरील आरोप सिद्ध झालेले आहे. त्यानंतर त्यावर दंड आकारला जाऊ शकतो. असे आरबीआयने सांगितले होते. तसेच KYC मार्गदर्शक तत्वे 2016 च्या काही तरतुदींचे पालन न केल्यामुळे रिझर्व बँकेने हिंदुजा लेलँड फायनान्स लिमिटेडला 4.90 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. तसेच पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.