RBI Repo Rate : रेपो रेटबाबत RBI चा मोठा निर्णय; तुमच्या कर्जावर काय परिणाम होणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटबाबत (RBI Repo Rate) निर्णय जाहीर केला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये कोणताही बदल कऱण्यात आला नसल्याचे जाहीर केलं आहे. देशात सध्या रेपो रेट 6.5% वर असून हाच रेट कायम ठेवण्यात आला आहे. आरबीआयच्या 6-सदस्यीय चलनविषयक धोरण समितीने 4:2 च्या बहुमताने व्याजदरांमध्ये कोणताही बदल करण्याचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे गृहकर्ज, वाहनकर्जाचे EMI सुद्धा जैसे थे राहणार आहेत. कर्जाचा ईएमआय कमी होण्याची प्रतीक्षा पाहणाऱ्या ग्राहकांना यामुळे कोणताही दिलासा मिळाला नाही.

शक्तिकांत दास म्हणाले की यावेळीही बैठकीत उपस्थित सदस्यांनी रेपो रेट स्थिर (RBI Repo Rate) ठेवण्याचा निर्णय घेतला असून आता एक वर्षांनंतरही आरबीआयचा मुख्य कर्ज दर ६.५ टक्क्यांवर स्थिर राहिला आहे. आमची नजर विकसित अर्थव्यवस्था असलेल्या देशांवर आहे. यासह, आम्ही मुख्य घटक देखील लक्षात ठेवत आहोत. व्याजदराबाबत कोणताही निर्णय या गोष्टी लक्षात घेऊनच घेतला जाईल. यापूर्वी RBI ने मे 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान रेपो रेट 2.50 टक्क्यांनी वाढवला होता आणि तो 6.5 टक्क्यांवर नेला होता. तेव्हापासून, चलनविषयक धोरण समितीने सलग ८ बैठकांमध्ये या रेपो रेटमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

रेपो रेट कधी कमी जास्त होतो ? RBI Repo Rate

जेव्हा महागाई खूप जास्त असते, तेव्हा RBI अर्थव्यवस्थेतील पैशाचा प्रवाह कमी करण्याचा प्रयत्न करते आणि रेपो दर वाढवते. सहसा 0.50 किंवा त्यापेक्षा कमी वाढ केली जाते.याहून जास्त वाढ किंवा घट होत नाही. जेव्हा देशाची अर्थव्यवस्था वाईट काळातून जात असते तेव्हा रिकव्हरी साठी पैशाचा ओघ वाढवावा लागतो आणि अशा परिस्थितीत RBI रेपो रेट कमी करते.