UPI पेमेंटबाबत RBI चा मोठा निर्णय, गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केली घोषणा

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी सांगितले की,”डिजिटल ट्रान्सझॅक्शन जास्त परवडणारे बनवण्यासाठी RBI पेमेंट सिस्टीममधील शुल्कांबाबत चर्चा पेपर जारी करण्याचा प्रस्ताव देत आहे.” याव्यतिरिक्त, ते म्हणाले की” RBI फीचर फोन युझर्ससाठी UPI-बेस्ड पेमेंट प्रॉडक्ट लाँच करेल आणि लहान मूल्याच्या ट्रान्सझॅक्शनसाठी प्रक्रिया प्रवाह सुलभ करेल.”

शक्तिकांता दास म्हणाले की,”डिजिटल पेमेंटमध्ये विविध शुल्क परवडणारे करण्यासाठी अभ्यास केला जाईल.” दास पुढे म्हणाले की,”लवकरच डेबिट-क्रेडिट कार्ड, वॉलेट्स आणि UPI यांसारख्या पेमेंट सिस्टीमबाबत चर्चा पेपर जारी केला जाईल. डिजिटल पेमेंट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फीचर फोनवर आधारित UPI पेमेंट सिस्टीम तयार केली जाईल. म्हणजेच, तुम्ही इंटरनेटशिवायही UPI पेमेंट करू शकाल. त्याचप्रमाणे रिटेल डायरेक्ट Gsec आणि IPO मध्ये UPI द्वारे पेमेंट करण्याची लिमिट 2 वरून 3 लाखांपर्यंत वाढवली जाईल.”

संपूर्ण काम कसे होणार?
या सुविधेद्वारे, फीचर फोन युझर्स त्यांचे बँक खाते, डेबिट कार्ड आणि रजिस्टर्ड मोबाइल फोन नंबरशी लिंक केलेला ऑथेंटिकेशन पिन तयार करून मर्चंट पेमेंट तसेच पीअर-टू-पीअर ट्रान्सझॅक्शन्स करू शकतील. NPCI ने दावा केलेल्या नवीन रिपोर्ट्स नुसार, हे UPI पिन जनरेट करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पद्धतीप्रमाणेच आहे. याव्यतिरिक्त, फीचर फोन युझर्स सामान्य डायल-इन सर्व्हिसद्वारे ऑथेंटिकेशन पिन तयार करण्यास सक्षम असतील, जी NPCI द्वारे ऑपरेट केली जाऊ शकते.

UPI म्हणजे काय?
UPI, ज्याला आपण इंग्रजीत युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणतो,”ही डिजिटल पेमेंट पद्धत आहे जी मोबाईल अ‍ॅपद्वारे काम करते. या अ‍ॅपद्वारे तुम्ही सुरक्षित पद्धतीने पेमेंट करू शकता. यामध्ये पैसे अडकले तरी बँक खात्यात पैसे परत मिळतात. तुम्ही UPI द्वारे बिले भरू शकता, ऑनलाइन फंड ट्रान्सफर करू शकता आणि नातेवाईक किंवा मित्रांना पैसे पाठवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल आणि यासाठी मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडलेला असावा.