100 -200 च्या नोटांबाबत RBI चा महत्वाचा आदेश; जनतेला होणार फायदा

atm (1)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्हाला एटीएममधून पैसे काढताना 100 आणि 200 रुपयाच्या नोटा मिळत नसतील, तर लवकरच तुमची ही अडचण दूर होणार आहे. कारण भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँकांना अन व्हाइट लेबल एटीएम ऑपरेटरांना (WLAO) एक मोठा आदेश जारी केला आहे, ज्यामध्ये एटीएममध्ये या नोटांची उपलब्धता वाढवण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे जे ग्राहक या समस्यांना सामोरे जात होते, त्याच्यासाठी आता पैसे काढणे सोयीस्कर होणार आहे. तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

आरबीआयचा मोठा निर्णय –

एका वृत्तानुसार, आरबीआयने एका परिपत्रकात सांगितले आहे की , नागरिकांना त्यांच्या रोजच्या व्यवहारांसाठी सहज उपलब्ध असलेल्या मूल्यवर्गातील नोटा म्हणजे 100 आणि 200 रुपये मिळावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशानुसार, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत सर्व एटीएमपैकी किमान 75% एटीएममध्ये एक कॅसेट 100 किंवा 200 च्या नोटांसाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे. तसेच आरबीआयने स्पष्ट केले आहे की 31 मार्च 2026 पर्यंत देशातील 90% एटीएममध्ये किमान एक कॅसेट 100 किंवा 200 च्या नोटांसाठी असावा, याची खात्री बँकांनी व WLAO ने करावी.

नवीन इन्फ्रास्ट्रक्चर अंमलात आणण्याचा निर्णय –

ग्राहकांनी अनेक वेळा तक्रार केली होती की एटीएममधून प्रामुख्याने 500 रु च्याच नोटा मिळतात, आणि लहान नोटा क्वचितच उपलब्ध असतात. याचीच दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आरबीआयने 1 मे 2025 पासून एटीएम व्यवहारांसाठी नवीन इन्फ्रास्ट्रक्चर अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत महानगरांमध्ये दर महिन्याला 3 आणि इतर भागांमध्ये 5 मोफत व्यवहार करता येणार आहेत. यामध्ये आर्थिक अन गैर-आर्थिक दोन्ही प्रकारचे व्यवहार समाविष्ट असतील. त्यानंतरच्या व्यवहारांसाठी ठराविक शुल्क आकारण्यात येणार आहे.