विराटची आरसीबी सुसाट!! राजस्थान वर 10 विकेट राखून दणदणीत विजय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाने राजस्थान रॉयल्स वर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. यंदाच्या आयपीएल मधील आरसीबीचा हा सलग चौथा विजय असून अद्याप हा संघ अपराजित आहे. आक्रमक सलामीवीर देवदत्त पद्दीकलचे वादळी शतक हे या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले.

राजस्थानच्या 178 धावांचा यशस्वी पाठलाग करताना देवदत्तनं ५२ चेंडूत नाबाद १०१ धावा केल्या. तर विराटने ४७ चेंडूत नाबाद ७२ धावा केल्या. राजस्थानच्या गोलंदाजांना ही जोडी फोडण्यात सपशेल अपयश आलं. या विजयासह आयपीएल गुणतालिकेत बंगळुरुचा संघ अव्वल स्थानी पोहोचला आहे.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही. जोस बटलर स्वस्तात बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी राजस्थानला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. बेंगलोर कडून मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment