दिनेश कार्तिकसाठी RCB ची मोठी घोषणा!! चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आरसीबीचा माजी क्रिकेटपटू आणि विकेटकिपर दिनेश कार्तिकच्या (Dinesh Kartik) चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये कार्तिकने आपला अखेरचा सामना खेळत क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली. मात्र आता पुन्हा एकदा कार्तिक मैदानात दिसणार आहे. कारण दिनेश कार्तिकवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challenger Bangalore) मेंटॉर आणि फलंदाजी प्रशिक्षक पदाची जबाबदारी दिली आहे. फ्रेंचायजीने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली. त्यामुळे दिनेश कार्तिकच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

खेळाडू म्हणून दिनेश कार्तिकने आरसीबीला अनेक अशक्यप्राय विजय मिळवून दिले आहेत. मात्र यंदाची आयपीएल त्याच्या कारकिर्दीतील अखेरची ठरली. राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्याने अखेरचा सामना खेळला. यानंतर विराट कोहली, फाफ डुप्लेसिस यांच्यासह सर्व सहकारी खेळाडूंनी कार्तिकला गार्ड ऑफ ऑनर दिला. यानंतर 39 व्या वाढदिवशी दिनेश कार्तिकने निवृत्तीची घोषणा केली होती.

कार्तिकची आयपीएल कारकीर्द

दिनेश कार्तिकच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर कार्तिकने 257 सामन्यांमध्ये 4842 धावा केल्या. यामध्ये 22 अर्धशतकांचा समावेश आहे. आपल्या 17 वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत दिनेश कार्तिक RCB व्यतिरिक्त, दिल्ली डेअरडेव्हिल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स, गुजरात लायन्स आणि कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळला. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल 2024 मध्ये त्याने 15 सामन्यांमध्ये 187.36 च्या स्ट्राइक रेटने 326 धावा केल्या. आता त्याला मेंटॉर आणि फलंदाजी प्रशिक्षक पदाची जबाबदारी फ्रेंचायजी कडून देण्यात आली असून पुन्हा एकदा तो आरसीबीच्या ताफ्यात चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.