….त्यामुळे आम्ही हरतो ; चहलने सांगितले RCB च्या खराब कामगिरीच खरं कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने आत्तापर्यंत अनेक दिग्गज खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिलं. राहुल द्रविड, जॅक कँलिस पासून ते विराट कोहली,ख्रिस गेलं , एबी डिव्हीलिअर्स …असे अनेक खेळाडू असूनही आरसीबी अजून एकदाही आयपीएल जिंकू शकला नाही. आतापर्यंत अनेकदा RCB ने हातात आलेले सामने अखेरच्या षटकात हाराकिरी करुन गमावले आहेत. RCB चा महत्वाचा गोलंदाज लेगस्पिनर युजवेंद्र चहलने आपल्या संघाच्या खराब कामगिरीमागचं कारण सांगितलं आहे.

चहल म्हणाला, “मी गेली ६ वर्ष RCB कडून खेळतो आहे. माझ्यामते आमच्या संघासाठी खरी समस्या ही अखेरच्या षटकांतली गोलंदाजी ही आहे. १६-१७ व्या षटकापर्यंत सामना आमच्या हातात असतो. पण अखेरच्या ३ षटकांतल्या गोलंदाजीमुळे आम्ही आतापर्यंत ३० टक्के सामने गमावले असतील. अनेकदा १६ व्या षटकापर्यंत आम्ही प्रतिस्पर्धी संघाला १३० पर्यंत रोखून ठेवतो. त्यामुळे अखेरच्या ३ षटकांत फटकेबाजीचा विचार केला तर प्रतिस्पर्धी संघाने फारफार तर १६० पर्यंतचा पल्ला गाठायला हवा. पण अनेकदा आम्ही अखेरच्या ३ षटकांत खूप धावा देतो ज्यामुळे प्रतिस्पर्धी संघ १९०-२०० पर्यंत मजल मारतो. इथेच सामन्याचं चित्र पालटतं.” भारतीय संघाचा माजी खेळाडू आकाश चोप्राशी बोलत असताना चहलने आपले विचार मांडले.

आयपीएलच्या इतिहासात RCB ची कामगिरी अतिशय सुमार राहिली आहे. त्यामुळे विराटच्या नेतृत्वाखाली RCB चा संघ यंदा चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’