कराड शहरात कोरोनाचा पुन्हा शिरकाव, शनिवार पेठेतील एकाला कोरोना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यात आणखीन 28 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कराड शहरात कोेरोना विषाणुने पुन्हा शिरकार केला असून शनिवार पेठेतील एकाला कोरोना लागण झाली असल्याची माहिती सातारा जिल्हा शल्यचिकीत्सक आमोद गडीकर यांनी दिली आहे.

सातारा जिल्ह्यात एकुण कोरोना बाधितांची संख्या आता 919 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात ग्रामिण भागात कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, आजपर्यंत एकुण 699 जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर एकुण 42 जणांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.