हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पोस्ट ऑफिसकडून (Post Office Scheme) अनेक विविध योजना राबवल्या जातात. यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे आवर्ती ठेव (Recurring Deposit) योजना. ज्यात दररोज पैसे गुंतवल्यास लाखोंचा निधी उभा राहू शकतो. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला मोठा परतावाही दिला जातो. या योजनेमध्ये दरमहा शंभर रुपये गुंतवणूक खाते सुरू करता येऊ शकते. या योजनेत एकल आणि संयुक्त खाते उघडण्याची ही सुविधा देण्यात आली आहे. सध्याच्या घडीला या योजनेवर 6.7 टक्के चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळत आहे. तर नवीन व्याजदर 1 जानेवारी 2020 पासून लागू करण्यात आले आहे.
आवर्ती ठेव योजनेत किती रुपये गुंतवावेत??
महत्वाचे म्हणजे, आवर्ती ठेव योजनाही जोखीममुक्त आहे. परंतु या योजनेत दरमहा योग्यवेळी गुंतवणूक करणे अनिवार्य आहे. या योजनेचा हप्ता चुकला तर गुंतवणूकदाराला एक टक्का दंड भरावा लागतो. तसेच चार महिने हप्ता चुकवला तर RD खाते आपोआप बंद करून टाकले जाते. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी पाच वर्षांचा आहे. सुरुवातीला आवर्ती ठेव योजनेत दररोज 333 रुपये जमा करावे म्हणजेच महिन्यात तुम्ही दहा हजार रुपये गुंतवाल. असे केल्यास तुमची वार्षिक गुंतवणूक 1.20 लाख रुपये होईल. ज्यामुळे तुमची पाच वर्षाच्या मॅच्युरिटी पर्यंत 6 लाखांची बचत होईल. पुढे मॅच्युरिटी नंतर तुम्हाला 7,13,659 रुपये मिळतील.
लक्षात ठेवा की या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे. परंतु तो पाच वर्षांपुढे ही वाढवला जाऊ शकतो. म्हणजेच एकूण दहा वर्षांसाठी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. असे केल्यास दरमहा तुम्ही एकूण बारा लाखांची गुंतवणूक कराल. ज्यावर तुम्हाला 5.08,546 रूपये व्याज मिळेल. यानंतर दहा वर्षात तुम्हाला 17,08,546 रूपये मिळतील. अशा बऱ्याच सोयीसुविधांसाठी पोस्ट ऑफिसची योजना गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय ठरत आहे.