हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारतामध्ये नारळाचा वापर स्वयंपाक घरामध्ये केला जातो. तसेच नारळाचे तेलही अधिक प्रमाणात वापरले जाते. नारळ हा चवीसाठी जितका चांगला लागतो तितकाच तो शरीरासाठी ही फायदेशीर ठरतो. तुमची कंबरदुखत असेल किंवा गुडघेदुखीचा त्रास जाणवत असेल तर त्यावर नारळ रामबाण उपाय आहे. एका हेल्थ रिपोर्टमधून समोर आले आहे की, नारळाचे तेल हाडांची रचना सुधारते. तसेच कोकोनट ऑईलमुळे हाडे फॅक्चर होण्याचा धोका ही टळतो.
त्यामुळे दररोज नारळाचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर ठरते. तुम्ही नारळाचे लाडू बनवून ही ते खाऊ शकता. नारळाच्या लाडूमध्ये आयर्न, फायबर, प्रोटीन अधिक असते. त्यामुळे नारळाचे लाडू कंबरदुखीवर किंवा सांधेदुखीवर गुणकारी ठरतात. हे नारळाचे लाडू तुम्ही साखरेऐवजी गूळ वापरूनही बनवू शकता. आज तुम्हाला गुळ आणि नारळ वापरून लाडू कसे बनवायचे हे सांगणार आहोत.
साहित्य
नारळ – अर्धा किलो
डिंक- 300 ग्राम
काजू, बदाम – 100 ग्राम
आक्रोड- 100 ग्राम
मनुके – 100 ग्राम
तूप – अर्धा किलो
नारळाचे लाडू बनवण्याची कृती
- सर्वात प्रथम नारळाचे लाडू बनवण्यासाठी नारळ घ्या. त्यानंतर वरचा तपकिरी भाग सोलून काढा. आता गॅसवर तवा ठेवा आणि त्यात अर्धी वाटी तूप घाला.
- या तुपामध्ये काजू, बदाम, अक्रोड, मनुके सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्या. पुढे बारीक केलेले खोबऱ्याचे तुकडे हलक्या सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्या.
- आता एका पॅनमध्ये डिंक आणि अर्धा किलो गूळ घालून ते वितळवा. गुळ आणि डिंका वितळत असताना त्यात भाजलेले ड्रायफ्रूट बारीक करून घाला.
- यानंतर त्यामध्ये भाजलेले खोबरे आणि कोरडे मेवे ही आवश्यकतेनुसार घाला. हे सर्व साहित्य एकजीव करून घेतल्यानंतर गॅस बंद करा.
- हे सर्व मिश्रण थोडे थंड झाल्यानंतर लाडू बांधायला सुरुवात करा. लाडू बांधून झाल्यानंतर त्यावर खोबऱ्याचा कीस वरून घाला. आणि हे लाडू रोज सकाळी एक एक खावा.