सुप्रिया सुळेंविरोधात लढण्यास तयार – विजय शिवतारे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदार संघात कोठेही विकास केला नाही, असा आरोप शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली आहे. विजय शिवतारे हे शिवसेनेचे वरिष्ठ नेते असून, शिवसेनेचे प्रवक्तेही आहेत. पुण्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघातून विजय शिवतारे शिवसेनेचे आमदार आहेत.

सुळे यांनी या मतदार संघात फक्त चष्मे, काट्या आणि श्रावणयंत्रे वाटली आहेत, ते तर कार्यकर्तेही वाटतात याला विकास म्हणत नाहीत. अशी टीका विजय शिवतारे यांनी केली आहे.’योद्धा नेहमी तलवार काढून असतो, तो फक्त आदेशाची वाट पाहत असतो,’ असे म्हणत विजय शिवतारे यांनी सुप्रिया सुळेंविरोधात लढण्यासाठी तयार असल्याचे सूचित केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात बारामती-मावळमध्ये संतापाची मोठी लाट असल्याचा दावाही विजय शिवतारे यांनी केला आहे.

 
इतर महत्वाचे –

भाजपकडून मोदी प्रचारासाठी महाराष्ट्रात, २५ सभा होणार

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाबुराव मुटकुळे यांना देशसेवा पुरस्कार प्रदान

जीवनात यशस्वी व्यक्ती बनण्यासाठी हे करा…

Leave a Comment