Real Estate : देशात रिअल इस्टेट ट्रेंड बदलत चालल्याचा दिसतो आहे. गृहनिर्माण क्षेत्राच्या स्थितीचे मूल्यमापन केले असता. महत्वाची माहिती समोर आली आहे. मागच्या काही वर्षात गृहनिर्माण क्षेत्रातील उलाढाल चांगलीच वाढली आहे. याबाबतच माहिती समोर आली असून देशातील विक्री न झालेल्या घरांची संख्या गेल्या ६ वर्षांत मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. एकट्या दिल्लीचा विचार केला तर दिल्ली-एनसीआरमध्ये न विकल्या गेलेल्या घरांच्या (Real Estate) यादीत 57 टक्क्यांची मोठी घट झाली आहे. ॲनारॉकच्या नुकत्याच आलेल्या अहवालात ही बाब समोर आली आहे.
5 वर्षांत विक्री न झालेल्या घरांच्या यादीत घट
ॲनारॉकने सांगितले की, 2018 च्या पहिल्या तिमाहीत न विकल्या गेलेल्या घरांच्या यादीची संख्या 2 लाख युनिट्स होती, जी 2024 च्या पहिल्या तिमाहीच्या शेवटी 86,420 युनिट्सवर आली आहे. म्हणजे पाच वर्षांत त्यात मोठी घट झाली आहे. खरे तर गेल्या काही वर्षांत घरांच्या विक्रीत (Real Estate) प्रचंड वाढ झाली आहे.
काय सांगते आकडेवारी (Real Estate)
दिल्ली-एनसीआरमध्ये गेल्या 5 वर्षांत न विकल्या गेलेल्या घरांच्या संख्येत 57 टक्के घट झाली आहे. याशिवाय कोलकात्यात न विकल्या गेलेल्या इन्व्हेंटरीमध्येही 41 टक्क्यांनी घट झाली आहे. तर दक्षिण भारतात सरासरी 11 टक्क्यांनी आणि पश्चिम भारतात म्हणजे मुंबई, पुण्यात 8 टक्क्यांनी घटली आहे. याचवेळी दक्षिणेकडील बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईत या शहरांत मिळून ही संख्या 1 लाख 96 हजारांवरून 1 लाख 76 हजारांवर आली आहे. हैदराबादमध्ये नवीन घरांच्या पुरवठ्यात गेल्या 6 वर्षांत चौपट वाढ झाली आहे. त्यामुळे विक्री न झालेल्या घरांची संख्या अधिक दिसत आहे. केवळ बंगळुरूचा विचार करता 6 वर्षांत विक्री न झालेल्या घरांची संख्या 50 टक्क्यांनी घटली आहे. मुंबई आणि पुण्याचा विचार करता विक्री न झालेल्या घरांची संख्या 6 वर्षांत 3 लाख 13 हजारांवरून 2 लाख 90 हजारांवर आली आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
याबाबत माहिती देताना अनारॉक ग्रुपचे उपाध्यक्ष संतोष कुमार यांनी सांगितले की, दिल्लीत नवीन घरांचा पुरवठा विकासकांनी नियंत्रणात ठेवल्याने विक्री न झालेल्या घरांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी (Real Estate) होण्यास मदत झाली. देशभरात नवीन घरांचा पुरवठा वाढत असताना विक्री न झालेल्या घरांचे प्रमाण कमी होत असून, गृहनिर्माण क्षेत्राची आगेकूच त्यातून दिसून येत आहे.