Real Estate : घरांच्या किंमती वाढणार की घटणार? काय सांगतोय नाइट फ्रॅंकचा अहवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Real Estate : मागच्या काही वर्षात रिअल इस्टेट क्षेत्रात जबरदस्त वाढ झाली आहे. देशातल्या प्रमुख शहरांमध्ये तर घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या पाहायला मिळत आहेत. अशा स्थितीत सर्वसामान्य कुटुंबाना घर घेणे म्हणजे मोठी कसरत करावी लागत आहे. याबाबतचा एक अहवाल आता समोर आला असून त्यामध्ये मोठी महत्वाची माहिती समोर आली आहे. रिअल इस्टेट कन्सलटंट फर्म नाइट फ्रॅंक यांनी हा अहवाल सादर केला असून या अहवालानुसार २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून २०२४ या कालावधीत देशातील मालमत्तेच्या किंमतीत मोठी वाढ झाली (Real Estate)आहे. चला जाणून घेऊया…

मुंबई जगात दुसऱ्या क्रमांकावर (Real Estate)

अहवालात मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत देशातील तीन मोठ्या शहरांमध्ये घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामध्ये मुंबई, नवी दिल्ली आणि बंगळुरू यांचा समावेश आहे. त्यातही मुंबईच्या बाबतीत बोलायचे झाल्यास जगातील प्रमुख शहरांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. जुनमध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये मुंबईतील घरांच्या किमती वार्षिक आधारावर १३ टक्क्यांनी वाढल्या आहेत. अर्थात मागील वर्षीच्या जुनच्या तिमाहीमधील घरांच्या किंमतींच्या तुलनेत यावर्षीच्या तिमाहीत मुंबईतील घरांच्या किंमती १३ टक्क्यांनी वाढल्या आहेत. हा आकडा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांच्या आकडेवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

नवी दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर (Real Estate)

दिल्लीच्या बाबतीत सांगायचे झाले तर नवी दिल्लीच्या रहिवासी भागातील किंमतीमध्ये १० टक्क्यांहून अधिक तेजी पाहायला मिळाली आहे. जूनमध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये 10.6 टक्क्यांनी वाढले आहेत. तर बंगळुरू बद्दल सांगायचं झाल्यास बंगळुरू येथील घरांच्या दरात वार्षिक आधारावर 3.7 टक्के इतकी वाढ नोंदवली गेली आहे. घरांच्या किंमती सर्वाधिक वाढणाऱ्या शहरांमध्ये नवी दिल्ली तिसऱ्या तर बंगळुरू जागतिक (Real Estate) पातळीवर १५ व्या स्थानावर आहे.

घरांच्या किंमती चढ्याच राहणार ? (Real Estate)

त्यामुळे येत्या काळात भारतीय बाजारात घरांच्या मागणीत वाढ होऊन, घरांच्या किंमती या चढ्याच राहण्याची शक्यता असल्याचे नाइट फ्रॅंकने आपल्या अहवालात म्हटले आहे.