हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वस्तात मस्त मोबाईलसाठी ओळखल्या जाणाऱ्या Realme ने भारतीय बाजारपेठेत Realme 13 आणि Realme 13+ नावाचे २ नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. या दोन्ही मोबाईल मध्ये 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी सारखे अनेक दमदार फीचर्स देण्यात आलेत. 6 सप्टेंबरपासून Flipkart, Realme वेबसाइट, Realme Store ॲप आणि रिटेल आउटलेटवर हे दोन्ही मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध असतात. आज आपण रिअलमीच्या या दोन्ही स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
Realme 13 चे फीचर्स –
Realme 13 मध्ये 120Hz रिफ्रेश रेट सह 6.67 इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 580 nits पीक ब्राइटनेस मिळतो. कंपनीने मोबाईल मध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर बसवला असून Realme चा हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित कस्टम यूजर इंटरफेस UI 5.0 वर चालतो. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Realme 13 मध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा, आणि 2MP मोनो कॅमेरा देण्यात आला आहे, तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 16MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5000mAh बॅटरी बसवण्यात आली असून ही बॅटरी 45W अल्ट्रा चार्जला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन IP65 रेटिंगसह येतो. तसेच यामध्ये वाय-फाय 6, व्हेपर कूलिंग सिस्टम, स्टिरिओ ड्युअल स्पीकर यांसारखी फीचर्स मिळतात.
किंमत किती?
Realme 13 5G स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 19,999 रुपये आहे. हा मोबाईल पर्पल आणि ग्रीन रंगात उपलब्ध आहे.
Realme 13+ 5G चे फीचर्स –
Realme 13+ 5G मध्ये 6.67-इंचाचा FHD+ E4 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 120Hz रिफ्रेश रेट आणि 2,000 nits पीक ब्राइटनेसचा सपोर्ट मिळतो. कंपनीने या मोबाईल मध्ये MediaTek Dimensity 7300 Energy प्रोसेसर बसवला असून या स्मार्टफोन Android 14 वर आधारित realme UI 5.0 वर काम करतो. बाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Realme 13 मध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा, आणि 2MP मोनो कॅमेरा देण्यात आला आहे, तर समोरील बाजूला 16MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 80W अल्ट्रा चार्जला सपोर्ट करते. अन्य फीचर्सबाबत बोलायचं झाल्यास मोबाईल मध्ये IP65 रेटिंग, रेनवॉटर स्मार्ट टच टेक्नॉलॉजी, वाय-फाय 6 आणि व्हेपर कूलिंग सिस्टम यांसारखी फिचर आहेत.
किंमत किती?
Realme 13+ तीन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यातील 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 22,999 रुपये आहे, 8GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे आणि 12GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन गोल्ड आणि ग्रीन रंगात उपलब्ध आहे.