Realme C63 5G मोबाईल स्वस्तात लाँच; किंमत 10000 रुपयांपेक्षा कमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कमी पैशात आणि स्वस्तात मस्त मोबाईल खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. स्वस्त मोबाईल साठी प्रसिद्ध असणाऱ्या रिअलमी कंपनीने Realme C63 5G नावाचा नवा 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. या मोबाईलची सुरुवातीची किंमत 10999 रुपयांपासून सुरु होते. किंमत जरी कमी असली तरी यामध्ये अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. येत्या 20 ऑगस्ट रोजी realme.com आणि Flipkart वर हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात…..

डिस्प्ले – Realme C63 5G

Realme C63 5G मध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटसह 6.67-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 1604 x 720 पिक्सल रिझोल्युशन आणि 625 निट्स पीक ब्राइटनेसचा सपोर्ट मिळतो. कंपनीने यामध्ये मीडियाटेक डायमेंशन 6300 प्रोसेसर बसवला असून यामध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज देण्यात आलं आहे. तुम्ही SD कार्डने स्टोरेज 2TB पर्यंत वाढवू शकाल. रिअलमीचा हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित realme UI 5.0 वर काम करतो.

कॅमेरा –

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, पाठीमागील बाजूला 32MP मुख्य कॅमेरा LED Flash सह येतो. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5000mAh बॅटरी बसवण्यात आली असून ही बॅटरी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. स्मार्टफोनला IP 64 रेटिंग देण्यात आले आहे म्हणजेच धूळ आणि पाण्यामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करू शकतो.

किंमत

realme C63 5G च्या . 4GB+128GB मॉडेलची किंमत 10999 रुपये, 6GB + 128GB मॉडेलची किंमत 11999 रुपये आणि 8GB + 128GB मॉडेलची किंमत 12999 रुपये आहे. या सर्व मोबाईल वर 1,000 रुपयांचा डिस्काउंट मिळतोय. हिरव्या आणि सोनेरी रंगात हा मोबाईल उपलब्ध असून 20 ऑगस्ट रोजी realme.com आणि Flipkart या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.