हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी रिअलमी ने सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशा किमतीत नवा मोबाईल लाँच केला आहे. Realme C63 असं या मोबाईलचे नाव असून यामध्ये 50MP कॅमेरा, 8GB RAM सह अनेक दमदार फीचर्स पाहायला मिळत आहेत. सध्या या मोबाईलचे लौंचिंग जागतिक बाजारात झालं असून लवकरच तो भारतात सुद्धा दाखल होणार आहे. आज आपण या हँडसेटचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
6.74 इंचाचा डिस्प्ले –
Realme C63 मध्ये 90 Hz रिफ्रेश रेटसह 6.74 इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले HD + रिझोल्यूशनसह येत असून 180Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 450 nits पीक ब्राइटनेससह येतो. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये Unisock चा T612 प्रोसेसर बसवला असून रिअलमीचा हा मोबाईल Android 13 वर चालतो. स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आलं आहे.
कॅमेरा – Realme C63
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Realme C63 मध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा देण्यात आलाय. तर सेल्फी आणि विडिओ कॉलसाठी समोरील बाजूला 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरसाठी या स्मार्टफोनमध्ये 5 हजार mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 45 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात ड्युअल सिम सपोर्ट, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक यांसारखे फीचर्स देण्यात आले आहे.
किंमत किती?
Realme C63 च्या 6GB + 128GB मॉडेलची किंमत 1,999,000 IDR (अंदाजे 10255.10 रुपये) आहे तर 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत 2,299,000 (अंदाजे 11794 रुपये) आहे. हा स्मार्टफोन निळ्या आणि हिरव्या अशा २ रंगात उपलब्ध असून 5 जून 2024 पासून इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये मोबाईलची विक्री सुरू होईल.