Realme C75 5G : लाँच झाला स्वस्तात मस्त मोबाईल; 6000mAh बॅटरी, 32MP कॅमेरा

Realme C75 5G
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता ब्रँड Realme ने भारतीय बाजारात ग्राहकांना परवडेल अशा किमतीत नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Realme C75 5G असं या मोबाईलचे नाव असून तो गतवर्षी लाँच झालेल्या C65 5G या स्मार्टफोनला रिप्लेस करेल. या हँडसेट मध्ये 6000mAh बॅटरी, 32MP कॅमेरा यासह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. भारतीय मार्केट मध्ये Realme चा हा मोबाईल redmi, samsung, oppo यांसारख्या ब्रँडला टक्कर देईल. आज आपण या स्मार्टफोनचे संपूर्ण स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात…..

6.67-इंचाचा डिस्प्ले – Realme C75 5G

Realme C75 5G मध्ये HD+ रिझोल्यूशनसह 6.67-इंचाचा LCD पॅनेल डिस्प्ले बसवण्यात आला आहे. या डिस्प्ले ला 120Hz चा रिफ्रेश रेट आणि 625 nits चा पीक ब्राइटनेस मिळतो. स्मार्टफोन मध्ये MediaTek चा Dimensity 6300 चिपसेट देण्यात आली असून रिअलमी चा हा मोबाईल Android 15 वर आधारित Realme UI 6 या ऑपरेटिंग सिस्टीम वर चालतो. Realme चा हा स्मार्टफोन अॅल्युमिनियम फ्रेमसह येतो. जर वापरकर्त्याला इअरबड्स चार्ज करायचे असतील तर हा फोन पॉवर बँक म्हणून वापरता येईल असा दावा केला जात आहे. मोबाईलला मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन MIL-STD-810H देण्यात आले आहे, त्यामुळे तो २ मीटर उंचीवरून पडला तरी त्याला काहीही होणार नाही असा दावा कंपनीने केला आहे..

कॅमेरा –

मोबाईलच्या कॅमेरा सेटअप बाबत सांगायचं झाल्यास, पाठीमागील बाजूला ३२ MP चा मुख्य कॅमेरा मिळतो तर समोरील बाजूला ८ MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर साठी मोबाईल मध्ये 6000mAh ची मजबूत बॅटरी बसवण्यात आली आहे. हि बॅटरी ४५W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, Realme C75 5G मध्ये साइड फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर, अल सिम, ५जी, वाय-फाय ८०२.११एसी, ब्लूटूथ ५.३ आणि यूएसबी-सी पोर्ट यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

किंमत किती?

आता राहिला प्रश्न तो म्हणजे मोबाईलच्या किमतीचा, तर Realme C75 5G च्या ४ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंट मोबाईलची किंमत १२,९९९ रुपये आहे तर ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेजचा मोबाईल १३९९९ रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. रिअलमी चा हा फोन लिली व्हाइट, मिडनाईट लिली आणि ब्लॉसम पर्पल रंगांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल.