हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Realme नेहमीच ग्राहकांना परवडेल अशा किमतीत स्मार्टफोन लाँच करत असतात. कमी पैशात उपलब्ध असल्याने अनेकजण रिअलमी चे मोबाईल खरेदी करत असतात. आताही कंपनीने 16GB रॅमसह एक नाव मोबाईल बाजारात लाँच केला आहे. Realme GT Neo 6 SE असे या स्मार्टफोनचे नाव असून आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात….
6.78 इंचाचा डिस्प्ले –
Realme GT Neo 6 SE मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 6000 nits पीक ब्राइटनेस आणि 2500Hz टच सॅम्पलिंग रेट मिळतोय. कंपनीने डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला व्हिक्टस 2 ग्लासचे प्रोटेक्शन दिले आहे. Realme GT Neo 6 SE मध्ये नवीन Snapdragon 7+ Gen 3 प्रोसेसर दिला असून हा स्मार्टफोन Realme UI 5.0 वर चालतो. खास बाब म्हणजे या स्मार्टफोनमध्ये 16GB रॅम पर्यंत रॅम आणि 512 GB पर्यंत स्टोरेज देण्यात आलं आहे.
50MP कॅमेरा – Realme GT Neo 6 SE
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Realme GT Neo 6 SE मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये पाठीमागील बाजूला 50MP चा मुख्य कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल सेन्सर देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5500mAh बॅटरी देण्यात आली असून हि बॅटरी 100W SUPERVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की फोन 12 मिनिटांत 50% चार्ज होतो.
किंमत किती?
मोबाईलच्या किमतीबाबत बोलायचं झाल्यास, हा मोबाईल सध्या तरी चीनमध्ये लाँच झाला आहे. यातील 8GB रॅम + 256GB व्हेरिएंटची किंमत 1699 युआन म्हणजेच अंदाजे 19,500 रुपये, 12GB + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 1899 युआन म्हणजेच अंदाजे 21,800 रुपये, 16 GB रॅम + 256 GB स्टोरेजमध्ये मोबाईलची किंमत 2099 युआन अंदाजे 24,000 रुपये आहे. आणि 16 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 2399 युआन म्हणजेच अंदाजे 27,600 रुपये आहे. हा स्मार्टफोन सिल्व्हर आणि ग्रीन या दोन कलर व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आला आहे.