हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Realme ने आपला Realme P1 5G स्मार्टफोन नव्या स्टोरेज व्हेरिएन्टमध्ये लाँच करण्यात आला आहे. यापूर्वी हा मोबाईल 6GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरियन्टमध्ये लाँच झाला होता. आता हा मोबाईल 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट बाजारात आला आहे. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर हा मोबाईल लिस्ट केला आहे.
काय फीचर्स मिळतात?
Realme P1 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. मोबाईल मध्ये MediaTek Dimensity 7050 5G चिपसेट बसवण्यात आली आहे. कंपनीकडून स्मार्टफोनला IP54 रेटिंग देण्यात आलं आहे. म्हणजेच धूळ आणि पाण्यापासून मोबाईलला कोणताही धोका नाही. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Realme P1 5G मध्ये पाठीमागील बाजूला 50MP चा मुख्य कॅमेरा आणि 2MP चा सेकंडरी कॅमेरा मिळतोय तर समोरील बाजूला 16MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी 5000mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 45W SuperVooc चार्जिंगला सपोर्ट करते.
किंमत किती? Realme P1 5G
Realme P1 5G चा 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 18,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. मात्र ग्राहकांना या मोबाईलवर २००० रुपयांची सूट मिळतेय. म्हणजेच तुम्ही 16,999 रुपयांत हा मोबाईल खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन लाल आणि हिरव्या रंगात उपलब्ध आहे. दुसरीकडे 6GB रॅम + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 15,999 रुपये आहे. तुम्हाला हा मोबाईल खरेदी करायचं असेल तर रिअलमी च्या ऑफिशिअल वेबसाईटला भेट द्यावी लागेल.