हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Realme ने त्यांचा Realme P1 Speed स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक चिपसेट आणि 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह एमोलेड डिस्प्लेसह उपलब्ध आहे. तसेच यामध्ये GT गेमिंग मोड देण्यात आला असून, ज्यामुळे गेमर्सना उत्तम अनुभव मिळणार आहे. हा मिड रेंज 5G स्मार्टफोन 9 लेयर कूलिंग सिस्टम आणि 6050mm वॅपर कूलिंगसोबत उपलब्ध होणार असल्यामुळे सर्व लोक याकडे आकर्षित होत आहेत.
Realme P1 चे फीचर्स
ग्राहकांना या फोनमध्ये 6.67 इंचाचा एचडी+ एमोलेड डिस्प्ले मिळणार आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz असून , 2000 निट्स पीक ब्राइटनेस देण्यात आला आहे. प्रोसेसर बदल बोलायचं झालं तर ऑक्टाकोर मीडियाटेक डाइमेंसिटी 7300 चिपसेट, जो Mali G615 MC2 जीपीयू सोबत जोडलेला आहे. यामध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 14GB वर्च्युअल रॅम तसेच 256GB स्टोरेज आहे. हा फोन BGMI, Free Fire, MLBB, आणि GT मोडसह COD यांसारख्या अनेक गेम्समध्ये 90 fps गेमिंग सपोर्टसह उपलब्ध आहे.
30 मिनिटांत 50% चार्जिंग
फोटो काढण्यासाठी 50MP मुख्य कॅमेरा आणि 2MP पोर्ट्रेट सेंसर देण्यात आले आहे. सेल्फी प्रेमींसाठी 16MP चा कॅमेरा आहे. त्यामुळे फोटो काढण्याचा अनुभव उत्तम होणार आहे. डस्ट आणि स्प्लॅश रेटिंग IP65 देण्यात आला आहे. हा फोन Android 14 Realme UI 5 सोबत मिळणार आहे. त्याचसोबत 45W फास्ट चार्जिंगसह 5000mAh ची बॅटरी आहे, जी फक्त 30 मिनिटांत 50% पर्यंत चार्ज होऊ शकते. तसेच हा फोन ग्राहकांना दोन रंगात ब्रश निळा आणि टेक्सट्यूरेड टायटॅनियममध्ये उपलब्ध होणार आहे.
नो कॉस्ट ईएमआय ऑफर
हा फोन दोन स्टोरेज वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 8GB + 128GB चा फोन 17999 रुपये मध्ये लॉन्च केला आहे. यावर 2000 रुपये किमतीचा लिमिटेड कूपन उपलब्ध आहे, ज्यामुळे ऑफर प्राइस 15999 रुपये असणार आहे . तसेच 12GB + 256GB वेरिएंट 20999 रुपये मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यावरही लिमिटेड कूपन वापरल्यास हा फोन 18999 रुपये उपलब्ध होईल . याची खासियत अशी कि दोन्ही फोनवर कंपनी तीन महिन्यांसाठी नो कॉस्ट ईएमआय ऑफर करत आहे. तसेच हा फोन ग्राहकांसाठी 20 ऑक्टोबर पासून फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे.