बंडखोर आमदारांकडून आसाम मधील पूरग्रस्तांना 51 लाखांची मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या बंडखोर आमदारांकडून आसामच्या पूरग्रस्तांना 51 लाखांची मदत करण्यात आली आहे. गेल्या 9 दिवसांपासून आसाम मध्ये तळ ठोकून आहेत. तेथील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदारांनी ही मदत केली आहे.

आसाम मधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अस ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून आसाम मधील पूरस्थिती चिंतेची ठरली आहे. मुसळधार पावसामुळे ब्रह्मपुत्रा आणि बराक नद्यांच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने आसाममध्ये पूरस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. आतापर्यंत 55 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. तर 103 जणांचे बळी गेले आहेत. एनडीआरएफ जवान बचावकार्य राबवित आहे.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी उद्या राज्य सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगितले आहे. त्यामुळे सर्व बंडखोर आमदारांना उद्या कोणत्याही परिस्थितीत मुंबईला यावे लागणार नाही. गेल्या ९ दिवसांपासून हे सर्व आमदार गुवाहाटी मध्ये तळ ठोकून आहे. मात्र उद्या सकाळीच विश्वासदर्शक ठरावा वेळी हे आमदार येतील. त्यामुळे ठाकरे सरकारच भवितव्य उद्या समजेल.