खासदार संभाजीराजेंच्या सैन्याविषयीच्या कार्याची दखल घेत, भारतीय सैन्याने केला विशेष सन्मान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतीश औंधकर
भारतीय सेनेच्या दिल्ली मुख्यालयाकडून खासदार छत्रपती संभाजी राजे यांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. जनरल ऑफिसर कमांडिंग, कर्नल ऑफ दी रेजिमेंट(मराठा लाईट इंफंट्री) लेफ्ट.जन. मिस्त्री यांनी संभाजीराजे यांच्या सैन्याविषयीच्या कार्याची दखल घेत हा सन्मान केला.

”भारतीय सैन्य दलांचे आणि छत्रपती घराण्याचे शेकडो वर्षांचे घनिष्ठ नाते आहे. ती उज्ज्वल परंपरा जपून पुढे घेऊन जाण्याचा मी प्रयत्न करत आहे. राजकीय, सामाजिक जीवनात कितीही व्यस्त असलो तरी, वेळात वेळ काढून मी सैन्य दलांच्या अधिकारी व सैनिकांच्या भेटी घेत असतो. सैन्य दलाच्या अनेक कार्यक्रमांना जात असतो. छत्रपती घराण आणि सैन्याला एकत्र जोडून ते नाते अजून घट्ट कसे करता येईल यासाठी माझे सदैव प्रयत्न असतात.” अशी प्रतिक्रिया संभाजी राजे यांनी यावेळी दिली.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

मोठी बातमी : 24 व्या आठवड्यात महिलांना गर्भपात करता येणार; कॅबिनेट मंत्रिमंडळाची मंजुरी

दिल्ली वासियांनो, विनोद तावडेंना सरकारी शाळा दाखवा, छोले बटूरे खाऊ घाला; अरविंद केजरीवालांनी उडविली विनोद तावडेंची खिल्ली

कोल्हापूरात खासगी सावकारांच्या घरी छापे; १२ आधिकारी ६३ कर्मचाऱ्यांचा सहभाग

 

Leave a Comment