कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान घरी बनवा मसाला भात,कसा बनवायचा जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आणि भीती पसरली आहे. कोरोना विषाणू किंवा कोविड -१९ चा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी लॉकडाऊन सगळीकडे केले आहे. ज्यामुळे लोकं घरातच कैद केले गेले आहेत. अशा परिस्थितीत घरातील प्रत्येक कामासोबत स्वयंपाक करणे हे बर्‍याच लोकांसाठी एक मोठे काम बनते. जर आपणही याच विवंचनेत असाल की आज आपल्याला काय बनवायचे,तर आपण मसाला भात करुन पाहू शकता.

मसाला भात हे एक लवकर तयार होणारा पदार्थ आहे. तांदूळ आणि आपल्या काही आवडत्या भाज्या घालूनही हे बनवता येते. हे सुमारे २० मिनिटांत तयार होईल. जे तुम्ही खूप खाऊ शकता.तर असा हा मसाला भात बनवण्याची कृती जाणून घ्या.

मसाला भात बनवण्यासाठी लागणारे साहित्य

२ कप शिजवून थंड झालेले तांदूळ
२ गाजर चिरलेले
२ बटाटे चिरलेले
९-१० सोयाबीन चिरलेले
हिरवा वाटाणे एक तृतीयांश कप
६ बेबी कॉर्न कापलेले
१ कांदा चिरलेला
१ चमचा गरम मसाला पावडर
१ चमचा लाल तिखट
१ चमचा जिरेपूड
आणि चवीनुसार मीठ

मसाला भात कसा बनवायचा

प्रथम कढईत तेल टाकून गरम करा. गरम झाल्यावर त्यात जिरे आणि नंतर कांदे घाला आणि थोडा मऊ होईस्तोवर तळा.
आता चिरलेली भाजी घाला आणि २ मिनिटे तळा.
मीठ, तिखट, गरम मसाला आणि जिरेपूड घाला, चांगले मिक्स करावे आणि १०-१२ मिनिटे तसेच झाकून ठेवा.
आता या व्हेज मसाल्यात तांदूळ घाला आणि मिक्स करा.
तुमचा मसाला भात तयार आहे. याला दही आणि कांद्याबरोबर सर्व्ह करा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

मसाला राइस: Masala chawal recipe in hindi- India TV

Leave a Comment